Nashik Loksabha Constituency: नाशिक मतदारसंघातील स्पर्धेतून मनसेची माघार? गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

Political News : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackeraysakal

Nashik Loksabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून दावा होत असताना चौथा दावेदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्पर्धेतून परस्पर माघार घेतल्याचे बोलले जात आहे. (Loksabha Election 2024) अर्थात मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. (Nashik Loksabha Constituency MNS withdrawal news)

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून वोटर सर्वेच्या माध्यमातून दावा करण्यात आला होता. धार्मिक क्षेत्र असल्याने भाजपला नाशिकची जागा हवी होती. १९८५ नंतर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार येथे उभा राहिलेला नाही.

त्यामुळे आता महापालिकेतील सत्ता व शहरात तीन आमदार असल्याने भारतीय जनता पक्षाला लोकसभेची जागा हवी होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचा खासदार येथून निवडून येत असल्याने शिवसेनेला पारंपरिक पद्धतीने ही जागा हवी होती. अद्यापही या जागेसाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे स्थानिक व राज्यस्तरावरील नेते नाशिकच्या जागेवर अद्यापही दावा कायम असल्याचे सांगतात. शिवसेनेकडून तीव्रपणे दावा दाखल होत असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने नाशिक लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितला. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जात असताना या दाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने चौथ्या स्पर्धकाची जोड मिळाली होती. (Nashik Political News)

MNS Raj Thackeray
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमधून गोडसे नाहीत अन भुजबळही नाहीत..! महायुतीकडून नव्या चेहऱ्याच्या चाचपणीला वेग

राष्ट्रवादी व शिवसेनेत स्पर्धा

भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा व देशाचे गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीत दोनदा भेट झाली या भेटीच्या माध्यमातून महायुतीत चौथा भिडू तयार झाला. भाजपकडून लोकसभेची तयारी केली जात असताना राज्यात पुढील सहा महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणूकादेखील डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील मतदार जवळ करण्याबरोबरच उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी राज ठाकरे यांना भाजपने चाल दिली. ठाकरे- शहा यांच्या भेटीतून नाशिकची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळावी अशी मागणी जोर धरू लागली.

परंतु अचानक शिवसेनाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा जाऊन छगन भुजबळ हे नाशिकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिकच्या दाव्याची हवा हळूहळू निघाली. एकंदरीत सद्यस्थितीमध्ये भाजप व मनसे स्पर्धेतून बाद झाल्यासारखी स्थिती असून नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या शिंदे गटात स्पर्धा सुरू आहे.

MNS Raj Thackeray
Nashik Lok Sabha Constituency: ...तर शिवसैनिक भुजबळांचे काम नाही करणार; महायुतीत बेबनाव, सचिव चौधरी यांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com