Nashik Lok Sabha Constituency : महायुतीच्या धर्माला अनेकांकडून ‘खो’; हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळांवर निशाणा

Nashik : निवडक पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे सांगून गोडसे यांनी अप्रत्यक्षपणे ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत पराभवाची खदखद व्यक्त केली.
Hemant Godse, Chhagan Bhujbal
Hemant Godse, Chhagan Bhujbal esakal

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार व माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आज पराभवाची कारणमीमांसा करताना माझ्या विजयासाठी शिवसेनेसह भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनीही काम केले.

मात्र, निवडक पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे सांगून गोडसे यांनी अप्रत्यक्षपणे ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत पराभवाची खदखद व्यक्त केली. त्याचबरोबर महायुतीविरोधात लाट व विलंबाने जाहीर झालेली उमेदवारी पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत जागेवरून धुसफूस सुरू होती. शिवसेनेच्या शिंदे गटाने जागेवर दावा केल्यावर भाजपनेही दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले; परंतु भाजपच्या वरिष्ठांकडून नाव जाहीर होण्यास विलंब झाला. भाजपचे काही पदाधिकारी, संघ परिवार, तसेच सोशल मीडियावरूनही भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध झाला.

अखेरीस भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेतून उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विलंबाने शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावरून नाशिक पुन्हा विकासाला मुकला, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे संदेश व्हायरल झाले. महायुतीत नाशिकच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली; परंतु आतापर्यंत उघडपणे धुसफुशीची चर्चा झाली नाही. (latest marathi news)

Hemant Godse, Chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha Vote Counting : नाशिकची 10, तर दिंडोरीची 9 तास मतमोजणी

गोडसे यांच्या पराभवानंतर कारणमीमांसा सुरू झाली. गोडसे यांनीच कारणमीमांसा स्पष्ट केली. त्यात भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, की काही मोजके सोडले तर महायुतीचा धर्म सर्वच पक्षांनी पाळला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी काम केले; परंतु काहींनी काम केले नाही. ज्यांनी काम केले नाही, त्यासंदर्भातील माहिती पक्षाच्या वरिष्ठांना देऊ. छगन भुजबळ प्रचारात सहभागी होते.

मात्र कोणी किती काम केले आणि प्रचारात किती व कशा पद्धतीने सहभागी झाले, हे नाशिककरांनी पाहिले आहे. प्रचार करीत असताना दिखावा नसावा. मतदारांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. प्रचार किती तळमळीने झाला, शेवटच्या मतदारांपर्यंत आपली भूमिका व महायुतीचा धर्म किती पोहोचला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

Hemant Godse, Chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha Constituency : भाजप आमदारांना ‘उद्धव’ शिलेदार भारी! सत्ता नसताना संघर्षात्मक लढा उभारण्याचा दिला संदेश

पराभवाला कारणीभूत गोष्टी

- उमेदवारी उशिराने जाहीर

- प्रचाराला कमी कालावधी

- पक्षातील स्पर्धकांची नावे येत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम

- लवकर उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीने मतदार जोडले

- कांदा निर्यातीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी

- राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने, तर महायुतीविरोधात लाट

- उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेक स्पर्धक तयार झाल्याने संभ्रम

- महायुती सरकारचे काही निर्णय चुकल्याने फटका

"माझ्या विजयासाठी महायुतीच्या घटक पक्षांतील शिवसेनेसह भाजप, मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांचा समावेश होता; परंतु काही निवडक पदाधिकाऱ्यांनी काम केले नाही. प्रचारात मनापासून सहभागी झाले नाहीत." - हेमंत गोडसे, माजी खासदार

Hemant Godse, Chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha Election : पराभवाची भाजपकडून झाडाझडती; प्रदेश कार्यालयाने मागविला अहवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com