Nashik Lok Sabha Constituency : महायुतीचे नाशिक मध्ये गुरुवारी शक्ती प्रदर्शन; रॅली द्वारे गोडसे अन डॉ. पवार भरणार अर्ज

Lok Sabha Constituency : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार जाहीर करण्यात आला.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency esakal

नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार जाहीर करण्यात आला. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ पडली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये लढत होईल. महाविकास आघाडी कडून उभाठा गटाचे राजाभाऊ वाजे निवडणूक लढवत आहे. ( Mahayuti show of strength in Nashik on Thursday )

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोडसे व पवार या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांकडून गुरुवारी (ता.२) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीकडून नाशिक शहरांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.(Nashik Political News)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी संकटमोचक ‘जनशांती धाम’मध्ये

50 हजार कार्यकर्त्यांचे नियोजन

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी 29 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्या शक्ती प्रदर्शनाला तोडीस तोड देण्याचा भाग म्हणून महायुती कडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. पन्नास हजार कार्यकर्ते आणण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शक्ती प्रदर्शनातून उत्तर

महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन 45 दिवस झाले मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नाही एक मे रोजी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले. प्रथम जागा निश्चिती व त्यानंतर उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाल्याने महायुती बद्दल नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये नकारात्मक वारे वाहू लागले. विरोधकांकडून देखील तसा प्रचार सुरू झाला त्याला उत्तर देण्याचा भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे महायुतीचे नियोजन आहे.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक शिवसेनेकडेच! पालकमंत्री दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com