Nashik Lok Sabha Constituency : प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करणार; पंकजा यांच्या बीडमधील वक्तव्याने खळबळ

Lok Sabha Constituency : पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवार म्हणून उभे करणार असल्याची घोषणा केल्याने महायुतीच्या इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.
pankaja munde and pritam munde
pankaja munde and pritam munde esakal

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामध्ये महायुतीकडून अद्याप जागा व उमेदवार निश्चिती होत नसताना बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवार म्हणून उभे करणार असल्याची घोषणा केल्याने महायुतीच्या इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. ( pankaja munde statement of Pritam Munde will be fielded from Nashik)

नाशिक लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला आहे. परंतु दुसरीकडे महायुतीकडून अद्याप कुठल्या पक्षाला जागा सोडावी याबाबत निश्चिती नाही. भाजप शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातून नाशिकच्या जागेवर दावा केला जात आहे. ठाण्याच्या बदल्यात नाशिक यावर भाजप व शिंदे सेनेत बोलणी सुरू आहे.

असे असताना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करणार असल्याची घोषणा केली. पंकजा यांची घोषणा तत्कालिन परिस्थितीमध्ये राजकीय असली तरी नाशिकमध्ये मात्र त्याचे परिणाम दिसून आले. (Nashik Political News)

pankaja munde and pritam munde
Nashik Lok Sabha Constituency 2024 : आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी

शिंदे सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटामध्ये नाशिकच्या जागेमध्ये स्पर्धा सुरू असताना पंकजा यांनी परस्पर प्रीतम यांची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीमध्ये नेमके काय चालले आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घरचं झाले थोडे...!

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. असे असताना पंकजा मुंडे यांनी परस्पर प्रीतम मुंडे यांची घोषणा केल्याने ‘घरचं झालं थोडं...’ अशी तिखट प्रतिक्रिया महायुतीतील घटक पक्षांमधील इच्छुकांकडून व्यक्त केली गेली. पंकजा यांच्या घोषणेमुळे नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीमधील तिढा कमी होण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसत आहे.

प्रीतम मुंडे यांच्या घोषणेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील धक्का बसला आहे. प्रीतम यांचे सासर नाशिकचे आहे. त्यामुळे बीडमध्ये प्रीतम यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिल्याने त्याची सारवासारव म्हणून नाशिकच्या जागेवर प्रीतम यांचे नाव जाहीर करण्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

pankaja munde and pritam munde
Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या मनात वेगळ्या घराचा विचार : सुधाकर बडगुजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com