Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन; वाजे, भगरे यांचे आज अर्ज

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक रणधुमाळीत नाशिक व दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (ता. २९) आपले अर्ज सादर करणार आहेत.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक रणधुमाळीत नाशिक व दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (ता. २९) आपले अर्ज सादर करणार आहेत. नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. (Lok Sabha Constituency Waje and Bhagare application today )

शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत शुक्रवार (ता. २६)पासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला. दिंडोरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित, सुभाष चौधरी यांनी अर्ज सादर केला.

येत्या शुक्रवार (ता. ३)पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने इच्छुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाविकास आघाडीने सोमवारचा मुहूर्त निश्‍चित केला असून, जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी उमेदवारांनी ठेवली. दिंडोरीपेक्षा नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच होणार असल्याने याठिकाणी शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवून देण्याची संधी उमेदवारांना मिळाली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते या शक्तिप्रदर्शनात सहभागी होतील. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी चारच दिवस शिल्लक असल्याने इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना कारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निश्‍चित होऊन अर्जही सादर होण्याची वेळ आली.

पण, महायुतीला नाशिकमध्ये उमेदवार मिळालेला नाही. येत्या आठवड्यात या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, नाशिकची लढतही स्पष्ट होईल. महायुतीतर्फे गुरुवारी (ता. २) अर्ज सादर करण्याचे नियोजन सुरू आहे. (Latest Marathi News)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : वाजेंना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटेंच्या नावावर विचार

महायुतीत चर्चा उमेदवारीचीच

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल, याविषयी नाशिककरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना उमेदवार का घोषित केला जात नाही, याचे नागरिकांना आश्‍चर्य वाटते. ऐनवेळी होणारी बंडखोरी टाळण्यासाठी इतका उशीर केला जात असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे महायुतीच्या शक्तिप्रदर्शनापेक्षा उमेदवाराची चर्चा अधिक रंगताना दिसते.

पंतप्रधान मोदींची १० ला पिंपळगाव येथे सभा

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिकसह दिंडोरी आणि धुळे-मालेगावसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या १० मेस पिंपळगाव बसवंत येथे होणार असल्याचे निश्चित मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

त्या दृष्टीने भाजप पदाधिकारी कामाला लागल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासकीय पातळीवरून पंतप्रधान मोदी यांच्या सभेसंदर्भात कोणतीही सूचना पोलिस यंत्रणेला मिळालेली नाही; परंतु सभेसाठी ग्रामीण पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले. पिंपळगाव बसवंत येथे बाजार समितीच्या प्रांगणात सभा होण्याची शक्यता आहे.

पिंपळगाव येथे गत पंधरा वर्षांत मोदी यांची ही तिसरी सभा असेल. सभेच्या नियोजित मैदानाची पाहणी आज आमदार दिलीप बनकर व भाजपच्या नेत्यांनी केली. सभेचे व्यासपीठ व अपेक्षित गर्दी याबाबत नियोजनाची चर्चा झाली. महायुतीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांच्या सभा दिंडोरी मतदारसंघात होणार असल्याचे समजते.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी, नाशिकमध्ये ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com