Nashik Lok Sabha Election 2024: साडेतीनविरुद्ध अडीच मतदारसंघांची लढाई! शहरी मतदारांचा प्रभाव अधिक, ग्रामीण भागाचा पगडा

Political News : साडेतीन विधानसभेचे मतदार शहरी तर उर्वरित अडीच मतदार संघांवर ग्रामीण भागाचा मोठा पगडा असल्याने या साडेतीन विरुद्ध अडीच मतदार संघातील लढाईत मुख्यत्वे महत्त्वाची ठरत आल्याचे मागील तीन निवडणुकांमधून दिसून येत आहेत.
Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024esakal

नाशिक : साडेतीन विधानसभेचे मतदार शहरी तर उर्वरित अडीच मतदार संघांवर ग्रामीण भागाचा मोठा पगडा असल्याने या साडेतीन विरुद्ध अडीच मतदार संघातील लढाईत मुख्यत्वे महत्त्वाची ठरत आल्याचे मागील तीन निवडणुकांमधून दिसून येत आहेत. त्यामुळे शहरी मतदारांवर प्रभाव पाडणारा घटक विजयाचा खरा दावेदार ठरणार आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 Battle of two half constituencies against three half Influence of urban voters rural areas prevail marathi news)

नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये यापूर्वी निफाड, येवला व नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा समावेश होता. परंतु सन २००९ मध्ये मतदार संघ पुनर्रचनेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून निफाड, येवला व अकोले वगळण्यात आले. निफाड व येवला, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले तर अकोले मतदार संघ हा नगर मतदारसंघाकडे जोडण्यात आला.

यापूर्वी ठाणे ग्रामीण मतदार संघामध्ये समाविष्ट असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदार संघ नाशिक लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघांचे पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये पूर्वी एक असलेल्या नाशिक विधानसभा मतदारसंघाचे तीन विधानसभा मतदारसंघ झाले.

नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य यातील मतदारसंघात व्यतिरिक्त देवळाली, इगतपुरी व सिन्नर मतदार संघ मिळून नाशिक लोकसभेचा मतदार संघ अस्तित्वात आला. नाशिक शहरातील पूर्व, मध्य व पश्चिम या तीनही मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.

तीनही आमदार भारतीय जनता पक्षाचे तर आहेच, त्याशिवाय महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक याच तीनही मतदारसंघातून भाजपचे निवडून आले आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघातील काही भाग नाशिक महापालिका हद्दीत येतो, तर उर्वरित भाग नाशिक तालुक्यात आहे.

सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. सिन्नरमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. आघाडी व युतीच्या बदलत्या राजकारणाचा विचार करता इगतपुरी हा काँग्रेसचा मतदार संघ वगळता देवळाली व सिन्नरचे आमदार महायुतीतील घटक पक्षांमध्ये सहभागी आहे.  (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : TMCविरोधात भाजपचा मास्टरस्ट्रोक! रेखा पात्रा यांना दिली उमेदवारी; संदेशखालीशी आहे थेट संबंध

त्यामुळे एका अर्थाने नाशिक लोकसभा मतदारसंघावर महायुतीचेच वर्चस्व असल्याचे दिसून येत. मात्र असे असले तरी येत्या निवडणुकीत खरे चित्र स्पष्ट होईल. यापूर्वीच्या मतदानाचा विचार केल्यास अडीच मतदार संघामध्ये ग्रामीण मतदारांचा पगडा तर उर्वरित साडेतीन मतदार संघामध्ये शहरी मतदारांचा प्रभाव दिसून येतो.

पक्षांपेक्षा मतदारांचीच कसोटी

शहरी भागात भाजपचे तीनही आमदार व नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपच्या पर्यायाने महायुतीच्याच उमेदवाराचा प्रभाव अधिक राहणार आहे. उर्वरित विधानसभा मतदारसंघांचा विचार करता ग्रामीण मतदाराने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला साथ दिली आहे.

बदलत्या राजकारणामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्याने खऱ्या अर्थाने पक्षांऐवजी मतदारांचीच कसोटी लागणार आहे. नाशिक तालुका तसेच सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील एकगठ्ठा मतदान करुन घेण्यात महाविकास आघाडीला यश आल्यास महायुतीसमोर आव्हान निर्माण होऊ शकते.

याउलट महायुतीने स्वतःचे हक्काचे तीन विधानसभा मतदार संघ वगळता ग्रामीणमध्ये शिरकाव केल्यास महाविकास आघाडीसमोर आव्हान निर्माण होणार आहे. शहरी मतदारसंघात विकासाचे मुद्दे महत्वाचे आहे तर ग्रामीण भागात शेती व पाण्याचे मुद्दे महत्वाचे ठरतात.

Nashik Lok Sabha Election 2024
Dindori Lok Sabha Constituency: शरद पवार यांच्याकडून उमेदवारीचा सस्पेन्स कायम! संभाव्य यादीत उमेदवाराचा समावेश नसल्याने संभ्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com