Loksabha Election 2024: आरोग्य कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची कामे! 25 वर्षांत प्रथमच नियुक्ती; आरोग्यसेवा विस्कळित होण्याची शक्यता

Political News : आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सहसा अन्य मोहीम, उपक्रमांसाठी घेतले जात नाही.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी ड्यूटी दिलेली असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीच्या कामाला जुंपले आहे. आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सहसा अन्य मोहीम, उपक्रमांसाठी घेतले जात नाही. मात्र, यंदा आरोग्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक काम लावण्यात आले आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 work for ZP health workers)

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक शाखेकडून मनुष्यबळाची जमवाजमव सुरू आहे. सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आले आहे. आतापर्यंत आरोग्य विभागास यातून वगळण्यात येत होते. मात्र, यंदा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कामासाठी घेण्यात आले आहे.

मुख्यालयातील लेखा व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी नियुक्त केली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांसह प्रमुख वैद्यकीय अधिकारी वगळता यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व अधिकाऱ्यांनाही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

जिल्हाभरातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या नाहीत. मात्र, त्यांचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हा परिषदेत मुख्यालयातूनच होते. नियंत्रण करणारे अधिकारीच जागेवर नसल्याने प्रशासकीय कामकाज विस्कळित होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागातील आस्थापना प्रमुखालाही निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील १५० हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाची जबाबदारी या प्रमुखावर असते. त्यालाच निवडणूक कामासाठी घेतल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची कामे व रुग्णसेवा विस्कळित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी घेतलेले नाही; मात्र त्यांना आरोग्यसेवेसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. (latest marathi news)

Loksabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत उमेदवारीबाबत विसंवाद, गोंधळ! भाजप कांदाविरोधक; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

उष्णतेची लाट असताना कामे

यंदा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्याचे तापमान गत आठवड्यात ४० अंश सेल्सिअस पार गेलेले आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उष्माघातापासून बचाव करण्याचे आरोग्य यंत्रणेचे काम आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर भरण्यापूर्वीही पाण्याची तपासणी आरोग्य विभागातील कर्मचारी करत आहे. मात्र, असे असताना त्यांना निवडणुकीचे काम लावण्यात आले आहे.

२५ वर्षांत प्रथमच घेतले कामाला

आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत अत्यावश्यक सेवेत मोडत असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेतले जात नव्हते. मात्र, गत २५ वर्षांत प्रथमच आरोग्य विभागाला निवडणूक कामासाठी घेण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loksabha Election 2024
Solapur Lok Sabha Election : अनुसूचितच्या आठ जातींमधील ३८ उमेदवार; कर्नाटकातील वड्डर, बेडा जंगमचा राजकीय प्रयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com