Nashik Lok Sabha Election : नाशिकमध्ये 34 तर दिंडोरीत 19 इव्हीएम बदलले; व्हीव्हीपॅटही बदलत मतदान प्रक्रिया सुरळीत

Lok Sabha Election : लोकसभा मतदान प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण घटक असलेले इव्हीएम मशिन्समध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तातडीने बदलले.
EVM Machine
EVM Machine esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : लोकसभा मतदान प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण घटक असलेले इव्हीएम मशिन्समध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तातडीने बदलले. नाशिक लोकसभा मतदारसंघात ३४ तर दिंडोरीत १९ मशिन्स बदलल्या. तर कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅटमध्येही अडचण निर्माण झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने तातडीने अतिरिक्त मशिन्स वापरत प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येते. (34 EVM were changed in Nashik and 19 in Dindori )

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदानावेळी निर्माण होणारी तांत्रिक अडचण विचारात घेता अतिरिक्त मतदान यंत्रांचेही वाटप केले होते. दिंडोरीसाठी २३०५ बॅलेट युनिट, तसेच २३०५ कंट्रोल युनिट आणि २४९६ व्हीव्हीपॅटचे वाटप केले होते. तसेच नाशिकसाठी २२९० कंट्रोल युनिट, २२९० बॅलेट युनिट तर २४८० व्हीव्हीपॅट मशिनचे वाटप केले होते. जिल्हास्तरावर ५९८० बॅलेट युनिट, ९६६ कंट्रोल युनिट तर ७९९ व्हीव्हीपॅट युनिट राखीव ठेवले होते.

नाशिक मतदारसंघात सकाळी साडेपाच वाजता उमेदवारांसमक्ष मॉकपोल घेतला. या दरम्यान नाशिकमध्ये १२ कंट्रोल युनिट, २८ बॅलेट युनिट तर ३० व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने लागलीच ते बदलले. तर मतदान प्रक्रिये दरम्यान ६ बॅलेट युनिट, ३ कंट्रोल युनिट तर ३० व्हीव्हीपॅट मशिन बदलले. (latest marathi news)

EVM Machine
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये 61 टक्के, तर दिंडोरीत 63 टक्के मतदारांनी बजावला हक्क

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मॉकपोल दरम्यान १५ बॅलेट युनिट, १५ कंट्रोल युनिट तर ९ व्हीव्हीपॅट बदलले. दिवसभरात मतदानादरम्यान दिंडोरीमध्ये ४ बॅलेट युनिट २ कंट्रोल युनिट तर १२ व्हीव्हीपॅट बदलले. ग्रामीण भागात उन्हाचा पारा चाळीशीपार गेल्याने तापमानामुळेही मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. परंतु, प्रशासनाने त्यावर लक्ष ठेवून वेळीच दुसरे यंत्र वापरल्याने प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

बिघडलेले किंवा बंद पडलेले मतदान यंत्र -

मतदारसंघ....बीयू.... सीयू ….व्हीव्हीपॅट -

नाशिक…..... ३४.....१५........४४

दिंडोरी...... ….१९.....१९.......१८

EVM Machine
Nashik Lok Sabha Election : ‘EVM’ला हार घालणे भोवले! शांतीगिरी महाराजविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com