Nashik Lok Sabha Election : धुळे लोकसभेच्या रिंगणात यंदा नाशिक जिल्ह्याचा उमेदवार? डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव आघाडीवर

Lok Sabha Election : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने तिस-यांदा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरविले आहे.
Dr. Shobha Bachhav and Ashwini Patil
Dr. Shobha Bachhav and Ashwini Patilesakal

Nashik Lok Sabha Election : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने तिस-यांदा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपने उमेदवार जाहीर करत आघाडी घेतलेली असताना महाविकास आघाडी विशेषः काँग्रेस चा उमेदवारीचा घोळ अद्यापही सुरू आहे. गत दोन निवडणुकांमध्ये भाजप तसेच काँग्रेसचे उमेदवार हे धुळे जिल्ह्यातील होते. (Nashik Candidate of Nashik district in Dhule Lok Sabha area this year)

भाजपचे विद्यमान उमेदवारही धुळ्यातील असल्याने काँग्रेसकडून या निवडणुकीत नाशिक जिल्हयातील विशेषः कसमा पट्यातील उमेदवार देण्याचे निश्चित झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे आघाडीवर असून त्यावर दोन दिवसात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात धुळ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. भाजपचा गड झालेला हा मतदारसंघ सर करण्यासाठी काँग्रेस प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, आमदार पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या पत्नी आश्विनी पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू आहे. अश्विनी पाटील उच्चशिक्षित असून, संस्थेचा कारभार त्या सांभाळतात.

त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी असून त्यांची मोठी बहिण ही शरद पवार यांच्या कुटुंबात दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी करावी असा हट्ट पक्षांतर्गत एका गटाकडून सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे हेदेखील उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. डॉ. शेवाळे उमेदवारीसाठी आग्रही आहेत मात्र, त्यांचा पूर्वानुभव पाहता त्यांच्यावर पक्षाचा विश्वास नसल्याचे बोलले जात आहे.  (latest marathi news)

Dr. Shobha Bachhav and Ashwini Patil
Nashik Lok Sabha Election : कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सलग तीनदा सुचना; शिंदे सेनेकडून पुन्हा शक्तीप्रदर्शन

धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. मागील दोन निवडणूकांमध्ये भाजप तसेच काँग्रेसचे उमेदवार हे धुळे जिल्ह्यातील होते. भाजपचे विद्यमान उमेदवारही धुळ्यातील असल्याने काँग्रेसकडून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील उमेदवाराच्या बाजूने कौल दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातही कसमा पट्ट्यातील उमेदवार रिंगणात उतरविल्यास विजय होत असल्याचा पूर्वानुभव आहे.

त्यामुळे या भागातील असलेल्या माजी मंत्री राहिलेल्या डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव आघाडीवर आहेत. डॉ. बच्छाव यांचे या भागात नातेगोते अधिक आहेत. डॉ. दिनेश बच्छाव हे मालेगाव तालुक्यातील असून त्यांचाही मोठा गोतावळा आहे. याचा फायदा पक्षाला होईल तसेच धुळ्यातून आमदार पाटील ताकद देतील असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकच्या उमेदवाराला धुळ्यात यश

धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपने यापूर्वी मविप्रचे माजी अध्यक्ष स्व. प्रतापदादा सोनवणे यांना रिंगणात उतरविले. या निवडणुकीत ते विजयी देखील झालेले आहेत. स्व. सोनवणे यांना मालेगाव, बागलाण भागातून त्यावेळी मोठा प्रतिसाद मिळाला होता. याचीच पुनरावृत्ती करीत, काँग्रेसकडून या भागातून उमेदवार देऊ शकतात. जिल्ह्यातील विशेषत: कसमा पट्ट्यातील उमेदवार उतरविल्यास विजय खेचून आणता येईल यादृष्टीने डॉ. बच्छाव यांचे नाव अंतिम होऊ शकते असे बोलले जात आहे.

Dr. Shobha Bachhav and Ashwini Patil
Nashik Lok Sabha Election : 10 हजारांच्या आतील खर्च ‘रोख’; उमेदवारांची अडचण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com