Nashik Lok Sabha Election : शहर-जिल्ह्यात बंदोबस्तासाठी जादा कुमक; शहर आयुक्तालयाचे नियोजन

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीदरम्यान शहर आयुक्तालय हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बळाला पाचारण करण्यात येणार आहे.
nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीदरम्यान शहर आयुक्तालय हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बळाला पाचारण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिस आयुक्तालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे अडीच ते तीन हजारांची जादा कुमक शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. (City Commissionerate Planning of Extra money for settlement in city district )

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांनी परिमंडळ एक व दोनमध्ये सर्व मतदान केंद्राचा आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली. दोन दिवसांनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, पुढच्या आठवड्यापासून शहरात राजकीय नेत्यांच्या सभा, प्रचारफेऱ्या, रोड शो होण्यास प्रारंभ होणार आहे.

तसेच, मतदानापर्यंत शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. शहरात अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक २३ केंद्रे संवेदनशील आहेत. पंचवटी, भद्रकाली, इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीतही अतिसंवेदनशील केंद्रे आहेत. या दृष्टीकोनातून विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके पोलिसांच्या निवडणूक कक्षातून नियमित निवडणुकीसंदर्भातील आढावा घेत आहेत. (latest marathi news)

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : उमेदवारांच्या ‘चिल्लर’पणाला बसणार लगाम! अनामत रक्कम म्हणून एक हजार रुपये स्वीकारणार

शहर आयुक्तालयाचे सुमारे तीन हजार पोलिस अधिकारी व अंमलदार कार्यरत आहेत. मात्र जादा कुमक लागणार आहे. तशी मागणी आयुक्तालयाने केली आहे. जादा कुमक आल्यास त्यांच्या निवासाची व्यवस्था पोलिस मुख्यालयातील बॅरेक किंवा विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील हॉलमध्ये केली जाणार आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत.

ग्रामीणकडूनही मागणी

नाशिक ग्रामीणमध्ये दिंडोरी व मालेगाव मध्य-बाह्य विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातही संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदारसंघ आहेत. त्यादृष्टीने पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती यांनी मतदार केंद्रांचा आढावा घेतला आहे. त्यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी सुरू केली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयामार्फत परिक्षेत्रात जादा पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अहवाल महासंचालक कार्यालयास देण्यात आला आहे. त्यानुसार जादा पोलिस बळ उपलब्ध होणार आहे.

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : 3 महिन्यांत 87 हजार मतदारांची वाढ; दिंडोरीत 21 हजार 666 मतदारांची भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com