Nashik Lok Sabha Election : वयोवृद्ध, दिव्यांगांचे आजपासून मतदान; नाशिक मध्य विधानसभेत 1 हजार 264 वृद्ध, 212 दिव्यांग मतदार

Lok Sabha Election : नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एक हजार २६४ वयोवृद्ध व २१२ दिव्यांग व्यक्ती गुरुवार (ता.९) पासून टपाली मतदान करणार आहेत.
 nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal

Nashik News : मतदान केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने यंदापासून उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा घेत नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एक हजार २६४ वयोवृद्ध व २१२ दिव्यांग व्यक्ती गुरुवार (ता.९) पासून टपाली मतदान करणार आहेत. (Nashik Lok Sabha Election)

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार (ता.२०) रोजी मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत व राज्य निवडणूक आयोग आग्रही आहे. कुणीही मतदार कोणत्याही कारणाने मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी आयोगाकडून व जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर यंदा ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसह ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता काही दिवसांपूर्वी अशा मतदारांचे सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. (latest marathi news)

 nashik Lok Sabha Election
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

निवडणूक प्रक्रियेत सहभागी सरकारी अधिकारी, कर्मचारी सैन्यदलात सेवेत असणारे सैनिक यांना मतदानाचे दिवशी केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाद्वारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मतपत्रिका आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक सोमवारी सायंकाळी पुण्याला गेले होते.

ही पथके नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर बुधवार (ता.८) पासून विधानसभा मतदारसंघनिहाय मतपत्रिका वितरित करण्यात आल्या. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी प्रत्येकी १५ हजार टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

 nashik Lok Sabha Election
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com