Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चा लढणार; बैठकीत एकमताने निर्णय

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
maratha kranti morcha
maratha kranti morchaesakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवारी देताना राजकीय पक्षात काम करणाऱ्या तसेच संघटना, समाजासाठी खस्ता खाल्लेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा ठरावदेखील करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या या भुमिकेमुळे लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडीकडून लढणया मराठा उमेदवारांसमोर अडचणी निर्माण होणार आहे. (Nashik Lok Sabha Election Maratha Kranti Morcha will contest in Nashik Constituency marathi news)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेवंता लॉन्स येथे नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाची बैठक झाली. मनोज जरांगे-पाटील यांनी काही दिवसांपुर्वी अंतरवेली सराटी येथे मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. मतदान बॅलेट पेपरवर घेण्यासाठी चारशेहून अधिक उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतू अडचणींमुळे तसे न करता एका मतदारसंघात एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे, कोल्हापूर पाठोपाठ सर्वाधिक मराठा समाज नाशिकमध्ये आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा मोर्चाचा उमेदवार उभा करण्यासाठी बैठक झाली. निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला उभे करायचे नाही. चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मतांचे विभाजन होऊ न देण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला.(latest marathi news)

maratha kranti morcha
Nashik Lok Sabha Election : मी लढणार म्हणजे लढणारच अन् पाडणारही; नाराज करंजकर यांचे बंडखोरीचे संकेत

सात सदस्यांची कमिटी

लोकसभा निवडणुक तसेच उमेदवार अंतिम करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या वतीने सात लोकांची कोअर कमिटी बनविण्यात आली होती. कमिटीचे सदस्य कुठल्याही राजकीय पक्षात किंवा संघटनेत नसल्याने त्यांना अंतिम निर्णय घेण्यासाठी एकमताने संमती दिली. जरांगे-पाटील यांनी कुठल्याही उमेदवाराचे नाव दिले तरी सगळे इच्छुक एकजुटीने प्रचार करणार असल्याचे ठरले. कोणीही वेगळी भूमिका घेणार नाही किंवा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असाही शब्द यावेळी इच्छुकांकडून देण्यात आला.

दिंडोरीत पाठिंबा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राखीव असला तरी मराठा समाजाविषयी जाण असलेल्या समाजाचे काम करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या व्यक्तीला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भुजबळांविरोधात थोपटले दंड

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी घोषित होण्यापुर्वीच मराठा नेत्यांकडून दंड थोपटण्यात आले. भुजबळ यांना तिसऱ्यांदा पराभूत करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. भुजबळांची पराभवाची हॅटट्रिक करून भुजबळांचा राजकारण कायमस्वरूपी संपवणार असल्याचे ॲड. शिवाजी सहाणे यांनी यावेळी सांगितले. छगन भुजबळ यांनी आता वयाचा विचार करून देव-देव करावे असा सल्ला मराठा आंदोलकांनी दिला.

maratha kranti morcha
Nashik Lok Sabha Election : गद्दारांना धडा शिकवा; वाजेंच्या भेटीत उद्धव ठाकरे यांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com