Nashik Lok Sabha Election : थेट अमेरिकेवरून सिन्नरला येत मयूर भगत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election : नाशिक जिल्ह्यातल्य लोकसभा मतदारसंघात सोमवारी (20 मे) मतदान झालं.
Mayur Bhagat
Mayur Bhagatesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : नाशिक जिल्ह्यातल्य लोकसभा मतदारसंघात सोमवारी (20 मे) मतदान झालं. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी यंत्रणा तसंच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली उच्च. तरुण मतदारांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसला. त्याचबरोबर वेगवेगळ्या मतदान केंद्रावर परदेशातील नागरिक आले होते. ( Mayur Bhagat who came directly from America exercised his right to vote )

इंजिनीयर मयूर सदाशिव भगत या तरुणानं थेट अमेरिका वरून येऊन मतदानाचा हक्क बजावला. सिन्नर शहरातील व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या कुटुंबियातील मयूर सदाशिव भगत हे कामानिमित्त अमेरिका येथे स्थायिक असून. मतदानाच्या हक्क बजावण्यासाठी ते थेट अमेरिका हून सिन्नर येथे आले व आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. (latest marathi news)

Mayur Bhagat
Nashik Lok Sabha Election : उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात होणार बंद; प्रशासन सज्ज, सोशल मीडियावर प्रचार

आमचे सर्व कुटुंब हे मोठे असून आमच्या घरात आमचे काका अर्थात सर्वस्व असणारे भाऊ बाबा आमचे भावंडे, आई, वहिनी, काकू व काकांचा व वडिलांचा यांचा आशीर्वाद तसेच सामाजिक कार्याचा आदर्श माझ्या डोळ्यापुढे आहे.

नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून अमेरिका येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे इंजिनिअर मयूर सदाशिव भगत यांनी सांगितले.

Mayur Bhagat
Nashik Lok Sabha Election : जळगावकरांच्या हाती दिंडोरीचे स्टिअरिंग; संकटमोचक गिरीश महाजनांचा मतदारसंघात तळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com