Nashik Lok Sabha Election : मतमोजणीनंतर दीड महिना मतदानाचा डाटा सुरक्षित! आक्षेप आल्यास पुन्हा मतमोजणी होणार

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट गुदामातच सुरक्षित ठेवले जातात. त्यातील माहिती (डाटा) ४५ दिवस साठवून ठेवलेली असते.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election esakal

Nashik news : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट गुदामातच सुरक्षित ठेवले जातात. त्यातील माहिती (डाटा) ४५ दिवस साठवून ठेवलेली असते. त्यामुळे उमेदवारांनी आक्षेप घेतल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुन्हा मोजणी करण्यात येते; मात्र आक्षेप न आल्यास ईव्हीएममधील सर्व डेटा नष्ट करण्यात येतो. (One and half months after counting of votes voting data is safe)

लोकसभा निवडणुकीचा येत्या मंगळवारी (ता. ४) निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिटचे काय करतात, याविषयी मतदारांच्या मनात कुतूहल असते. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सर्व यंत्रे ४५ दिवसांपर्यंत तशीच ठेवावी लागतात. २०१९ च्या निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातील एका उमेदवाराने न्यायालयात धाव घेतल्याने तब्बल पाच वर्षे तेथील मतदानयंत्रे गुदामात तशीच पडून होती.

अखेरीस दावा मागे घेण्यात आल्यानंतर ती वापरात आली होती. मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या ‘१७ सी’ या अर्जात एकूण मतदानाची आकडेवारी देण्यात आली आहे.

मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मोजलेली मते या ‘१७ सी’मधील आकडेवारीशी जुळवली जातील. त्यात तफावत आढळल्यास संबंधित मतदान केंद्राध्यक्षाकडील डायरीतील आकडेवारीशी पुन्हा जुळवणी केली जाईल. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : निवडणुकीचा ‘लाइव्ह’ निकाल बघा आज सिनेमागृहात!

ती न जुळल्यास व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठ्यांची पुन्हा एकदा जुळवणी केली जाईल. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया ही अतिशय पारदर्शी असते. मतमोजणीनंतर पाच व्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठ्यांचीही मोजणी केली जाते. उमेदवारांना यासंदर्भात शंका असल्यास निरीक्षकांसमोर पुन्हा मतमोजणी केली जाते. त्यानंतर हे सर्व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट सीलबंद करून गुदामांमध्ये ठेवले जातात.

प्रत्येक फेरीला अर्धा तास

मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठला सुरू होणार असून, सुरवातीला टपाली मतदान मोजण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठला ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यास सुरवात होईल. पहिल्या फेरीला साधारण अर्ध्या तासाचा वेळ लागणार असून, जिल्ह्यांतील दोन्ही मतदारसंघांचा विचार करता दुपारी दोननंतर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

टपाली मतमोजणी नियमानुसार शेवटच्या फेरीपूर्वी होणे अपेक्षित आहे. शेवटच्या फेरीतील मतांमध्ये ही मते मिळवली जातात. त्यानंतर अंतिम मते घोषित करण्यात येतात. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते.

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये धनुष्य चालणार की मशाल पेटणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com