Nashik Lok Sabha Election : पोलिस सतर्क; मतदान केंद्रांची पाहणी सुरक्षात्मक उपाययोजनांचा आढावा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांच्या सुरक्षिततेची पाहणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
Deputy Commissioner of Police Prashant Bachhav while inspecting the polling station school in Nashik Road area. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari and officers.
Deputy Commissioner of Police Prashant Bachhav while inspecting the polling station school in Nashik Road area. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari and officers.esakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांच्या सुरक्षिततेची पाहणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस उपायुक्तांनी शहरातील मतदान केंद्रांची पाहणी करून त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविला आहे. मतदान केंद्रांची पाहणी करताना मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. ( Police Alert for Inspection of polling stations Review of security measures )

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षात्मक उपाययोजना आणि पोलिस बंदोबस्त यासंदर्भात सातत्याने आढावा घेतला जात आहे. मतदान निर्विघ्न पार पाडण्यासाठी, कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडणार नाही यासाठी सर्वतोपरी उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत.

त्याअंतर्गतच, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत यांनी आपआपल्या हद्दीतील तर, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मतदान केंद्रांची पाहणी करीत सुरक्षेसंदर्भातील आढावा घेतला. शहरातील बहुतांशी मतदान केंद्र हे शाळा-महाविद्यालयांमध्ये असल्याने तेथील सुरक्षात्मक कंपाऊड, सुरक्षेसाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे यांची पाहणी केली.

तसेच, ज्या मतदान केंद्रांभोवती रहिवाशी भाग, व्यावसायिक दुकाने असतील अशा ठिकाणी रहिवाशी व व्यावसायिकांना सूचना देत नोटीसा बजाविल्या जाणार आहेत. जेणेकरून त्यांच्यामुळे मतदानाच्या सुरक्षिततेला अडथळा निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे मतदानासाठी येणार्या मतदारांसाठी पार्किंगची व्यवस्थेचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

Deputy Commissioner of Police Prashant Bachhav while inspecting the polling station school in Nashik Road area. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari and officers.
Nashik Lok Sabha Election : शहर-जिल्ह्यात बंदोबस्तासाठी जादा कुमक; शहर आयुक्तालयाचे नियोजन

बहुतांशी केंद्र तळमजल्यावर

शहरात असलेल्या मतदान केंद्र ही बहुतांशी शाळा-महाविद्यालयांमध्ये आहेत. त्यातही मतदारांना सोयीसाठी आणि सुरक्षात्मकतेच्या दृष्टीकोनातून मतदान केंद्र हे शाळेच्या तळमजल्यावरच असल्याचे पोलिसांच्या पाहणीतून समोर आले आहे. ही बाब सोयीची आहे. मतदान केंद्रांच्या पाहणीतून बंदोबस्ताची आखणी व नियोजन केले जाणार आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातील रहिवाशांना त्या दिवशी अनावश्यकरित्या बाहेर पडण्यास मनाई असेल. तर व्यावसायिकांना त्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

अशी होती पाहणी

- मतदान केंद्रांलगतची संरक्षण भिंत,

- प्रवेशद्वाराची तपासणी

- सीसीटीव्ही, सुरक्षा यंत्रणेचा आढावा

- मतदान केंद्रांलगतच्या शंभर मीटरपर्यंतची दुकाने, घरांना सूचना

- मतदान केंद्रांजवळील पार्किंग व्यवस्थेची पाहणी

''शहरातील मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. केंद्रांची सुरक्षात्मक आढावा व पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. काही सूचना करण्यात आल्या आहेत.''- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हेशाखा.

Deputy Commissioner of Police Prashant Bachhav while inspecting the polling station school in Nashik Road area. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari and officers.
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, भास्कर भगरेंसह 5 अर्ज दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com