Nashik Lok Sabha Election : नाशिक जिल्ह्याचे राजकारण दिग्गजांच्या सभांमुळे तापणार

Nashik News : महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत या कांद्याच्या आगारात सभा घेणार आहेत. त्याच दिवशी म्हणजे १५ मे रोजी खासदार शरद पवार यांच्यादेखील दिंडोरी व नाशिकमध्ये सभा होणार आहेत.
Sharad Pawar, Narendra Modi,  Uddhav Thackeray
Sharad Pawar, Narendra Modi, Uddhav Thackeray esakal

Nashik News : दिंडोरी, धुळे व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या मैदानात उतरत असताना त्याच दिवशी म्हणजे १५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देखील नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. त्यांच्या जोडीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील असणार असल्याने पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. (Nashik Lok Sabha Election)

२० मे रोजी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे व दिंडोरी या मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. सध्या मुंबईचा प्रचार शिगेला पोहोचला असून महाविकास आघाडी व महायुतीसाठी नाशिक, धुळे व दिंडोरी हे तीनही मतदार संघ महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात बाजी मारण्यासाठी व देशभर एक सकारात्मक संदेश देण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीने कंबर कसली आहे.

महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत या कांद्याच्या आगारात सभा घेणार आहेत. त्याच दिवशी म्हणजे १५ मे रोजी खासदार शरद पवार यांच्यादेखील दिंडोरी व नाशिकमध्ये सभा होणार आहेत. (latest marathi news)

Sharad Pawar, Narendra Modi,  Uddhav Thackeray
Nashik News : लोकसंख्येच्या तुलनेत नाट्यगृह अवघी दोनच! कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृहावर भार

याचदिवशी उद्धव ठाकरे यांचीदेखील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार उद्धव ठाकरे दोघेही एकाच व्यासपीठावरून नाशिककरांना संबोधित करणार आहेत.

दोघांच्याही संयुक्तपणे सभा घेण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे देखील पुढील आठ दिवस नाशिकच्या मैदानात तळ ठोकून राहणार आहेत. त्यामुळे या चार-पाच दिवसात नाशिक हे राजकारणाचे मुख्य केंद्रबिंदू असणार आहे.

Sharad Pawar, Narendra Modi,  Uddhav Thackeray
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com