Maharashtra Din 2024 : मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य : पालकमंत्री भुसे

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या महाराष्ट्राला घडविण्यासाठी समाजसुधारकांचे अविरत कष्ट, थोर स्वातंत्र्यसेनानींचा त्याग आणि अनेकांचे हात पुढे आले व येत आहेत.
Guardian Minister Dada Bhuse observed parade in main government program organized on occasion of Maharashtra Day.
Guardian Minister Dada Bhuse observed parade in main government program organized on occasion of Maharashtra Day.esakal

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या महाराष्ट्राला घडविण्यासाठी समाजसुधारकांचे अविरत कष्ट, थोर स्वातंत्र्यसेनानींचा त्याग आणि अनेकांचे हात पुढे आले व येत आहेत. त्या सर्वांच्या प्रती तसेच महाराष्ट्र निर्मितीसाठी योगदान दिलेल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मराठी अस्मितेचा अभिमान बाळगणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केले. (Maharashtra Din)

पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. (Latest Marathi News)

Guardian Minister Dada Bhuse observed parade in main government program organized on occasion of Maharashtra Day.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक शिवसेनेकडेच! पालकमंत्री दादा भुसे

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल.

श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या महाराष्ट्र गीत व अन्य स्फूर्तीदायक गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Guardian Minister Dada Bhuse observed parade in main government program organized on occasion of Maharashtra Day.
Nashik Lok Sabha Constituency : सर्व बाजूला ठेवा, मोदींसाठी एकजुटीने कामाला लागा : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com