Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची प्रक्रिया लांबणार! लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा परिणाम

Marathi News : यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी व मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे.
Police Recruitment
Police Recruitment esakal

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया गेल्या ५ तारखेपासून प्रारंभ झाली असून, येत्या ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत आहे. परंतु, नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत. यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी व मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे. (Nashik Maharashtra Police Recruitment Lok Sabha Election 2024 marathi news)

शासनाच्या गृहविभागाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या भरतीची प्रक्रिया गेल्या ५ तारखेपासून प्रारंभ झाली आहे. त्यानुसार, इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर पोलिस आयुक्तालयात ११८ पदांवरील भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर केली आहे, तर अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ग्रामीण दलातील ३२ जागांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. दोन्ही पोलिस दलांतील भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. ३० मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी ऑनलाईन सादर करावयाचे आहेत.

दरम्यान, नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहितेमुळे पोलिस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त राहणार आहेत. यामुळे पोलिस भरतीसाठीच्या पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी पोलीसांकडे मनुष्यबळाची कमतरता राहणार आहे. यामुळे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतरच्या पोलीस भरतीच्या पुढील नियोजनाबाबतचे नियोजन अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले नाही.

त्यामुळे जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरती प्रक्रियेचे नियोजन केले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काहीही जारी केलेले नसले तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर तशी सूचना जारी होण्याची शक्यता आहे.

Police Recruitment
Police Recruitment : मराठा समाजातील उमेदवारांची धांदल उडणार; प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस

उमेदवारांसाठी हेल्पलाइन

नाशिक शहर : ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४

नाशिक ग्रामीण : ०२५३-२३०९७०० किंवा २२००४५०

तयारीला मिळणार अवधी

एप्रिल, मे आणि जून महिन्याचे दोन आठवडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे असणार आहेत. त्यामुळे या काळात पोलीस भरतीची प्रक्रिया होण्याची चिन्हे जवळपास नाहीच. परिणामी, इच्छुक उमेदवारांना लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याकरिता जवळपास अडीच महिन्यांचा जादा अवधी मिळणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जूननंतरच भरतीच्या नियोजनाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Police Recruitment
Police भरतीची तयारी करताय? कुठे आणि कसा करायचा अर्ज? जाणून घ्या A to Z माहिती | police recruitment 2024

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com