Nashik News : निवृत्तिवेतनधारकांना फसवे कॉल्स : महेश बच्छाव

Nashik : जिल्हा कोशागार विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांना फसवे कॉल्स येत असून, त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
fake call
fake call esakal

Nashik News : जिल्हा कोशागार विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांना फसवे कॉल्स येत असून, त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काही निवृत्तिवेतनधारकांनी कोशागार कार्यालयात तक्रार दिली आहे. परंतु, कोशागार विभागाकडून कुठल्याही प्रकारे कॉल्स वेतनधारकांना केले जात नाही. (Mahesh Bachhav statement of Fraudulent calls to pensioners )

याशिवाय ऑनलाइन व्यवहार करावे, असे कधीही सांगितले जात नसल्याचे स्पष्टीकरण वरिष्ठ जिल्हा कोशागार अधिकारी महेश बच्छाव यांनी दिले आहे. जिल्ह्यातील निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना जिल्हा कोशागार विभागामार्फत विविध प्रकारचे लाभ दिले जातात. लाभ देताना कोणत्याही प्रकरे वसुलीबाबत अथवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोशागार कार्यालयामार्फत फोन केला जात नाही.

त्यांना ऑनलाइन व्यवहार करणेबाबत सूचितही केले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारची बतावणी करून कुणीही माहिती मागत असेल किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यास प्रवृत्त करत असेल तर ग्राहकांनी सजग व्हायला हवे. कुणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नये. तसेच ऑनलाइन व्यवहार करून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन बछाव यांनी केले आहे.

fake call
Nashik Crime News : अट्टल घरफोड्यास निमाणीतून अटक! 3 गुन्ह्यांची उकल

काही निवृत्तिवेतनधारकांना फोन करून ऑनलाइन रक्कम भरल्यानंतर कोशागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्सपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पेन्शनधारकांची जबाबदारी

ऑनलाइन व्यवहारात गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पैसे देणे, फसवे कॉल्स किंवा संदेशास प्रतिसाद देऊ नये. कुणीही रक्कम भरल्यास ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील, अशा प्रकारचा कोणताही दूरध्वनी अथवा कॉल आल्यास, तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास कोशागार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन बच्छाव यांनी केले आहे.

fake call
Nashik News :...अन्यथा चौघींचे होणार पुनर्वसन; अनाथ सापडलेल्या बालिकांच्या पालकांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com