
मालेगाव : शहरात नशेचा ट्रेंड बदलला आहे. येथे दशकभरापासून कुत्ता गोळीचा ट्रेंड होता. नशा करताना गांजा, कोरेक्स (खोकल्याची औषध) आदींचा वापर होतो. यात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढतो आहे. लॉकडाऊनपासून मोठ्या संख्येने तरुण महागड्या एमडीच्या नशाकडे वळले आहेत. तीन वर्षात ३८ जणांवर एमडी विक्रीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल गांजा आणि कोरेक्स औषधाचा वापर वाढला आहे.