Nashik News : मालेगाव सामान्य रुग्णालय होणार 300 खाटांचे! 135 कोटीच्या खर्चाला मंजुरी

Nashik News : शहरातील २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यात आले आहे.
Funding
Fundingesakal

मालेगाव : शहरातील २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. अतिरिक्त १०० खाटांच्या इमारत बांधकामासाठी सुमारे ७६ कोटी रुपये रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दाभाडी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून, याठिकाणी अतिरिक्त ५० खाटांसाठी ५९ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. (Nashik Malegaon General Hospital marathi news)

मालेगाव व दाभाडी रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा करत त्यास मंजुरी मिळवली. २०० खाटांचे सामान्य रुग्णालय ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्याने अतिरिक्त १०० खाटांच्या इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे.

अंदाजपत्रक हे इमारतीच्या बांधकामासह नियोजित आहे. शहरातील सामान्य रुग्णालयात शहर, तालुक्यासह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर महिला रुग्ण येत असतात. बाह्य रुग्ण विभागातही मोठ्या संख्येने रुग्ण असतात. या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन झाल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  (latest marathi news)

Funding
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी प्रथमच शहरात

रुग्णालयांच्या श्रेणीवर्धनास मंजुरी देतांनाच अंदाजपत्रकीय मान्यता दिल्याबद्दल श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे श्री. भुसे यांनी आभार मानले आहेत. आगामी काळात दाभाडी ग्रामीण रुग्णालयास लवकरच ट्रामा केअर सेंटरला मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सुविधा मिळणार

मालेगाव सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आल्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मल:निस्सारण, आग प्रतिबंधक, पार्कींग, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत व गेट, भु- विकास, वातानुकुलीत यंत्रणा सीसीटीव्ही आदींसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहे.

Funding
Nashik Marriage Registration: सुरक्षेच्या दृष्टीने विवाह नोंदणीला प्राधान्य! पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत नोंदणीचा वाढला टक्का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com