Nashik News: ऊसतोडणी कामगार घरी साजरी करणार होळी! साखर हंगाम संपत असल्याने कामगार सणापूर्वीच गावी

Nashik News : खान्देशसह राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यावर्षी महिनाभर आधीच बंद होणार आहे
Sugarcane worker
Sugarcane workeresakal

मालेगाव : खान्देशसह राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यावर्षी महिनाभर आधीच बंद होणार आहे. त्यामुळे कसमादेसह परिसरातील दहा ते पंधरा हजार ऊस तोडणी कामगार होळीचा सण आपल्या घरी साजरा करणार आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीत पुढील हंगामापर्यंत या कष्टकऱ्यांना रोजीरोटीसाठी कामाची शोधाशोध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. (Nashik malegaon Sugarcane workers marathi news)

कसमादेसह चाळीसगाव व धुळे परिसरात ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने आहेत. तालुक्यासह कसमादे भागातील ऊस तोडणी कामगार नगर, जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात तर काही कामगार गुजरातमध्ये ऊस तोडणीसाठी गेले आहेत. मालेगाव तालुक्यातील माळमाथा व काटवन भागातील हजारो कामगार ऊस तोडणीचे काम करतात.

यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम दिवाळीनंतर सुरु झाला. दिवाळी तोंडावर असतानाच कष्टकरी आपल्या बिऱ्हाडासह कारखाना स्थळावर पोचले होते. यावर्षी ऊस टंचाई अभावी अनेक कामगारांना जेमतेम चार महिनेच काम मिळाले. काही ठिकाणी कामगारांना पाच महिने ऊस तोडणीचे काम मिळेल.

काही कामगार जून ते सप्टेंबर या कालावधीत गावी शेती व शेतमजुरी करतात. या काळात ते मुकादमाकडून आगामी कामापोटी उचल घेत असतात. सहा महिने ऊसतोड व सहा महिने गावी शेती व इतर मिळेल ते काम असे साधारण ऊसतोडणी कामगारांचे नियोजन असते. यावर्षी कारखान्यांना दुष्काळाअभावी ऊसाची टंचाई भासत आहे.

त्यामुळे कारखाने बंद होवू लागले आहेत. १५ मार्चपर्यंत बहुतांशी कारखान्यांचा हंगाम संपेल. परिणामी ऊस कामगारांना महिनाभर आधीच गावी परतावे लागले. दरवर्षी कामगारांची होळी कारखाना स्थळावर साजरी होते. यावर्षी मात्र होळीपुर्वीच कामगार गावी परतण्याची शक्यता आहे.

Sugarcane worker
Nashik News : गोष्ट एका ‘रेशनकार्ड’ची! तहसीलदारांच्या समयसूचकतेने वाचला रुग्णाचा जीव

जनावरांना देखील मोबदला

कसमादेसह खान्देशमध्ये अनेक कुटुंबीय पारंपारिक पद्धतीने ऊस तोडणीचे काम करतात. यातील अनेक जण बैल व बैलगाडी देखील सोबत नेतात. यामुळे तोडणीसह बैलगाडीने ऊस वाहून नेण्याचा मोबदलाही मिळतो. शिवाय पाच ते सहा महिने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्‍न सुटतो.

"मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावरील ऊस तोडणी कामगार नगर व पुणे जिल्हा तसेच गुजरातमध्ये ऊसतोडणीसाठी गेले आहेत. उसाअभावी कारखान्यांचा हंगाम यावर्षी एक महिना आधीच संपणार आहे. त्यामुळे बहुसंख्य कामगार १५ ते २० मार्चच्या दरम्यान गावी परततील. कसमादेसह खान्देशमध्ये पारंपारिक ऊसतोड करणारे हजारो कामगार आहेत. गावी परतल्यानंतर कामगार शेती, मजुरी, हंगामी लहान व्यवसाय आदी मिळेल ती कामे करतात."

- विजय निकम, ऊसतोडणी मुकादम, गुगुळवाड

Sugarcane worker
Nashik News : शिक्षण नसतानाही प्रशिक्षणाने घडविल्या उद्योजिका! मोलमजुरीच्या कामातून मुक्तता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com