Maratha Survey Allowance : मराठा सर्वेक्षणाचे मानधन नाशिक मनपा कर्मचाऱ्यांच्या खात्यात

Nashik News : मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक स्थिती तपासण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जानेवारीत सर्वेक्षण करण्यात आले
Maratha Survey Allowance
Maratha Survey Allowanceesakal

Nashik Maratha Survey Allowance : मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक स्थिती तपासण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जानेवारीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची प्रगणक, पर्यवेक्षक व प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

या सेवेचे मानधन प्राप्त होत नसल्याने कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात होते. त्यापूर्वीच लेखा विभागाने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मानधनाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १ कोटी रुपये बँक खात्यात रक्कम जमा होईल. (Nashik Maratha Survey Allowance NMC employees)

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये नाशिक महापालिका हद्दीमध्ये ४ लाख ५२ हजार मिळकतीचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

त्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. २४२८ प्रगणक, १९६ पर्यवेक्षक, तर तीन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. दहा दिवसाच्या सर्वेक्षणामध्ये जवळपास चार लाख ५५ हजार ३५२ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १०,५०० रुपये भत्ता देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

परंतु सर्वेक्षण झाल्यानंतरदेखील मानधन प्राप्त झाले नाही. महापालिका म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे मानधनाची रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर लेखा विभागाने लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला.

यामुळेदेखील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य शासनाचा निधी असल्याने लेखा परीक्षणाची आवश्यकता नव्हती. असे असतानादेखील लेखापरीक्षण करून विलंब लावला जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र लेखा विभागाने तातडीने पावले उचलत बँक खात्यात मानधन जमा करण्याचा निर्णय घेतला. (latest marathi news)

Maratha Survey Allowance
Jalgaon Lok Sabha Election : जळगावात 45, रावेरसाठ 36 अर्ज दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयास यात्रेचे स्वरुप

२,४२८ प्रगणकांच्या खात्यावर ८२ लाख ४४ हजार ७०० रुपये, तर १९६ पर्यवेक्षकांच्या खात्यावर वीस लाख ५८ हजार रुपये व तीन प्रशिक्षकांना तीस हजार रुपये याप्रमाणे १ कोटी तीन लाख रुपयांचा निधी बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार (ता. २५) पासून पुढे चार दिवसात टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती लेखाधिकारी दत्तात्रेय पाथरूट यांनी दिली.

नाराजी कायम

महापालिकेच्या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचे १०, ५०० रुपये मानधन घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तीन ॲप्लिकेशन राज्य शासनाकडून पुरविण्यात आले. मात्र मानधन देताना ॲप्लिकेशननिहाय मानधन दिल्याने काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये तर काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहे. वास्तविक १०,५०० रुपये जमा होणे अपेक्षित असताना ॲप्लिकेशननिहाय रक्कम दिली जात असल्याने सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नाराजी कायम आहे.

Maratha Survey Allowance
Nashik News : डोळ्यादेखत हजारो लिटर पाणी मातीमोल; जलकुंभाला पाणीपुरवठा वितरण करणाऱ्या जलवाहिनीला गळती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com