
नाशिक : मागील पन्नास वर्षात नाशिकमध्ये मराठी मालिकांचे चित्रीकरण झाले नव्हते. परंतू, आता हे चित्र बदलत असून २०२० पासून शहरात आठ मराठी मालिका तर २०१४ पासून २२ मराठी चित्रपटांचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले असल्याची माहिती निर्मिती प्रबंधक कृष्णा मरकड यांनी दिली. पावसाळ्यात बहरलेले निसर्गसौंदर्य, ग्रामीण भागातील कौलारू घर, ग्रामीण संस्कृती, परंपरेमुळे मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिकही चित्रीकरणाच्या बाबतीत लोकप्रिय ठरत आहे.