Nashik Market Committee Election : आज फैसला; 12 बाजार समित्यांसाठी सरासरी 97 टक्के मतदान

Market Committee nashik
Market Committee nashikesakal

Nashik News : विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता.२८) शांततेत मतदान झाले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १२ बाजार समित्यांकरिता सरासरी ९७ टक्के मतदान झाले आहे. (Nashik Market Committee Election decision of market committees will be made on 29 april nashik news)

सर्वाधिक चांदवड, नांदगावला, येवला सर्वाधिक तर, कळवणमध्ये सर्वात कमी म्हणजे ९१ टक्के मतदान झाले आहे. तब्बल दोन वर्षांनी झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता कौल नेमका कोणाला मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मतदान संपुष्टात येताच कळवण, दिंडोरी, देवळा, सिन्नर व घोटी बाजार समित्यांच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. तर, नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, चांदवड, मालेगाव बाजार समित्यांचा शनिवारी (ता.२९) फैसला होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होऊन दुपारी बारावाजेपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल. नांदगाव बाजार समितीची मतमोजणी रविवारी (ता.३०) होणार आहे.

बाजार समित्यांची रणधुमाळीत यंदा कधी नव्हे ते विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. माघारी दरम्यान झालेली हाणामारी, मतदारांची झालेली पळवापळवी, मतदारांना मिळालेली व्हीआयपी ट्रींटमेंट, मतदारांचे वधारलेले भाव यामुळे या निवडणुकीला रंगत आली होती. १४ बाजार समित्यांमधील २२३ जागांसाठी ५३७ उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee nashik
Malegaon Market Committee Election : मालेगावला उत्साह अन् शांततेत मतदान; मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष

१२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी निश्चित केलेल्या १०६ मतदान केंद्रावर मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारांचा मतदानाचा मोठा उत्साह दिसून आला तर, दुपारी मतदारांचा निरूत्साह दिसला. २९ हजार ५०८ मतदारांपैकी २८ हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

पाच बाजार समित्यांचा रात्री उशिरा कौल प्राप्त झाला असून, उर्वरित सहा बाजार समित्यांचा शनिवारी निकाल हाती येणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होत असून एक मे रोजी मतमोजणी होणार आहे.

बाजार समिती एकूण मतदार संख्या सोसायटी ग्रामपंचायत व्यापारी हमाल एकूण टक्केवारी

देवळा १०४३ ५०० - ४२३ ९४ १०१७ ९७.५१

घोटी २३१९ ७१२ ८५७ ३६९ २२३ २१६१ ९३.१९

पिंपळगाव ब. २६६७ ९२१ ६५१ ६६१ ३७० २६०३ ९७.६०

चांदवड २२७६ १०१० ८३१ २९५ १०८ २२४४ ९८.५९

नाशिक ३३८८ १२६४ २००० - - ३२६४ ९६.३४

Market Committee nashik
Sinnar Market Committee Election : सिन्नर बाजार समिती कोकाटे अन् वाजे-सांगळे गटांना समान 9 जागा

येवला २६५८ १०३६ ८३२ ४०२ ३४७ २६१७ ९८.४६

नांदगांव १६६६ ६१४ ५६६ ३५० १११ १६४१ ९८.५०

सिन्नर २८५७ १२६० १०४९ १६८ ३२८ २८०५ ९८.१८

कळवण १७९४ ४९४ ७६१ २६४ ११२ १६३१ ९०.९१

मालेगाव ४२१७ १५८४ १२१७ १०६१ २५७ ४११९ ९७.६८

लासलगाव २२९३ ७७४ ५६७ ४९४ ३९६ २२३१ ९७.३०

दिंडोरी २३३० ६९३ १०९२ ४२६ ४८ २२५९ ९६.९५

एकूण २९५०८ १०८६२ १०४२३ ४९१३ २३९४ २८५९२ ९६.९०

Market Committee nashik
Nashik Market Committee Election : सत्ताधाऱ्यांना कौल तर दिंडोरीत परिवर्तन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com