Nashik Crime : नाशिकरोड परिसरात विवाहितेची पोत खेचली

Latest Crime News : पायी जाणाऱ्या विवाहितेची सोन्याचे मंगळसूत्र मोपेडवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली.
Nashik Crime
Nashik Crimeesakal
Updated on

नाशिक : नाशिकरोड परिसरातील मुक्तीधाम मैदानाच्या पाठीमागे राहत्या घरापासून पायी जाणाऱ्या विवाहितेची सोन्याचे मंगळसूत्र मोपेडवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली. दिया सोनलाला मेडतीया (रा. पूज्यसीताई सोसायटी, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १) रात्री साडेनऊच्या सुमारास त्या आनंदनगरमधील श्री गणेश प्राईड बिल्डिंगसमोरून पायी जात होत्या. (married woman was pulled mangalsutra in Nashik Road area )

त्यावेळी काळ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने विवाहितेच्या गळ्यातील ५० हजारांे २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून इगल सपोर्ट मैदानाच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक उपनिरीक्षक शेजवळ तपास करीत आहेत.

Nashik Crime
Nashik Crime : संशयित युवतीच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवकानं उचललं टोकाचं पाऊल! लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांच्या हाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com