esakal | होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर आवश्‍यकच; नाशिकच्या महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र

बोलून बातमी शोधा

satish kulkarni
होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचा वापर आवश्‍यकच; नाशिकच्या महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र
sakal_logo
By
विक्रात मते

नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांवर उपचार करताना ॲलोपॅथी बरोबरच आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधांचा वापर आवश्‍यकच असल्याचे आयुष मंत्रालयाने स्पष्टीकरण दिल्याने कोरोना रुग्णांवर या पॅथींचादेखील उपचार करावा, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व आरोग्य सचिवांकडे मुंबईत पत्राद्वारे केली.

नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेसह खासगी रुग्णालये फुल झाली आहे. ऑक्सिजन व व्हेन्टिलेटर बेड उपलब्ध नाही. या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी पत्रव्यवहार केला. कोरोनाबाधितांवर उपचार करताना ॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधांचा वापर करण्याची विनंती केली.आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथी व आयुर्वेदिक पॅथींचाही वापर कोरोनासारख्या आजारांमध्ये औषधोपचार म्हणून उपयोग होऊ शकतो. होम क्वॉरंन्टाईन असलेले रुग्ण, तसेच इतर नागरिक कोरोनाबाधित होऊच नये याकरिता होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यास निश्चितच रुग्णसंख्या कमी होण्यास मदतच होणार आहे. नाशिकमधील होमिओपॅथी व आयुर्वेदिक तज्ञांच्या मतानुसार एचआरसीटी स्कोअर ८ ते ९ पर्यंत असणारे कोविड रुग्ण हे निश्चितच बरे होऊन त्यांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. होमिओपॅथी व आयुर्वेदिक अंतर्गत चिकित्सा प्रणालीमध्ये उपचार केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या कमी होण्यास मदतच होणार असल्याचे सदर पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

महापालिकेच्या व शहरातील इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्णांना ॲलोपॅथी बरोबर होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक औषधे दिल्यास त्यांच्यावर कोणताही साइड इफेक्ट न होता रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे सरकार स्तरावरून निर्देश देण्याची विनंती करण्यात आली.

- सतीश कुलकर्णी, महापौर.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे! रुग्णांसाठी स्वत:ची कार केली रुग्णवाहिका