Nashik Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकला बैठक

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात विलंबाने उमेदवारी जाहीर झाल्यावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरत आहेत.
Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shindeesakal

Nashik News : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात विलंबाने उमेदवारी जाहीर झाल्यावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. बुधवारी (ता. ८) मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक होईल. (Meeting in presence of Chief Minister Eknath Shinde)

बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून पक्ष संघटनेतील मरगळ झटकण्याचा प्रयत्न होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाला. त्याचा परिणाम अद्यापही प्रचार कार्यावर दिसून येत आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यावर अवघे १७ दिवस प्रचारासाठी असल्याने व सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायचे असल्याने महायुतीच्या नेत्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातच महायुतीत नाराजीनाट्य अद्यापही कायम आहे. (latest marathi news)

Chief Minister Eknath Shinde
Nashik Tribal Development : ‘आदिवासी विकास’चे 42 कोटींचे लेखन साहित्य निविदा वादात?

नाशिक लोकसभेची जागा मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाची आहे. त्यांनी नाशिकची जागा प्रतिष्ठेची केल्याने या जागेवर पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ते नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. बुधवारी दुपारी साडेबाराला गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने ते पोलिस कवायत मैदानावर येतील. तेथून ते पक्षाच्या बैठकीसाठी रवाना होतील. बैठकीनंतर संगमनेरकडे प्रस्थान करतील.

Chief Minister Eknath Shinde
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com