Mahalakshmi Yatra : म्हसरूळला महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ! बारागाड्या ओढण्याप्रसंगी चैतन्याचे वातावरण

Nashik News : अक्षयतृतीयेनिमित्त म्हसरूळ येथील ग्रामदैवत महालक्ष्मीमाता यात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
Pulling carts on the occasion of Mahalaxmi Mata Yatra.
Pulling carts on the occasion of Mahalaxmi Mata Yatra.esakal

म्हसरूळ : अक्षयतृतीयेनिमित्त म्हसरूळ येथील ग्रामदैवत महालक्ष्मीमाता यात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १०) सकाळी देवी भक्त मंडळाच्या वतीने रामतीर्थ येथून कावडीत जल पदयात्राद्वारे मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर पुजारी शांताराम पोटिंदे यांनी गणेशमूर्ती, ग्रामदैवत महालक्ष्मी मूर्तीसह गावातील सर्वच मंदिरांतील देवतांचे अभिषेक पूजन केले. (Mhasrul Mahalakshmi Yatra begins)

त्यानंतर दुपारी महालक्ष्मी मंदिरासमोर होमहवन व सत्यनारायण पूजन झाले. सायंकाळी सातला बारागाड्या ओढण्याचे मानकरी गोविंद बाबा मोंढे यांनी देवी मंदिरासमोर बारागाड्या ओढल्या. त्या वेळी चैतन्याचे वातावरण झाले होते. गावातून महालक्ष्मीमाता रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

रथोत्सवनंतर रात्रभर तमाशा व बोहडा मिरवणुकीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी महालक्ष्मीमाता मंदिरात हजेरीच्या कार्यक्रमाने यात्रा उत्साहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन म्हसरूळ येथील महालक्ष्मीमाता मंदिर, पद्मावती सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष रुंजा मोराडे, उपाध्यक्ष योगेश मोराडे, सहसचिव वाळू शिंदे. (latest marathi news)

Pulling carts on the occasion of Mahalaxmi Mata Yatra.
Nashik News : खरीपासाठी मिळणार यंदा मुबलक बियाणे; बियाण्याचे पाकिट 853 ला

खजिनदार रघुनाथ गुंजाळ, विश्वस्त वाल्मीक शिंदे, अशोक मोराडे, राजेंद्र सातकर, भाऊराव बोंबले, शांताराम पोटिंदे, जयश्री बुरूंगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यात्रा उत्सवासाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात आली होती. यात अध्यक्षपदी राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष विशाल पोटिंदे, कार्याध्यक्ष प्रकाश कराटे, खजिनदार वाल्मीक शिंदे, सचिव विलास लांडे व ग्रामस्थांनी यात्रा उत्सव यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

भक्ती सरगमच्या वतीने भजन संध्या

महालक्ष्मीमातेच्या यात्रा उत्सवानिमित्ताने भक्ती सरगम भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी ‘माझी अंबिका स्वत्वाची उभी राहून थाटात’, ‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा’, चांदणं चांदण झाली रात’, अशी विविध देवीचे गाणे सादर करण्यात आली. या वेळी भजनसम्राट मधुकर चव्हाण, प्रकाश बर्वे, कैलास बागले, पद्माकर राजगुरू, राजेंद्र मोरे, अविनाश कडवे, नरेंद्र शेटे, नितीन गरकळ यांनी सहभाग नोंदविला.

Pulling carts on the occasion of Mahalaxmi Mata Yatra.
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे यंदा निधी नियोजन लांबणार; 18 जूननंतरच मुहूर्त लागण्याची चिन्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com