SAKAL Impact : म्हसरूळच्या ए.के. हाईटसमधील पाणीपुरवठा सुरळीत

SAKAL Impact : म्हसरूळ शिवारातील पुष्पकनगर भागातील ए.के हाईटसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता.
Sakal Impact
Sakal Impactesakal

SAKAL Impact : म्हसरूळ शिवारातील पुष्पकनगर भागातील ए.के हाईटसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. याप्रश्‍नी ‘सकाळ’ वृत्तपत्रासह माजी नगरसेवक अरुण पवार यांनी सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. म्हसरूळ भागातील ए.के. हाईटससह पुष्पकनगर येथील अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने रहिवासी त्रस्त होते. (nashik Mhasrul Smooth water supply in HK heights)

याबाबत मनपा पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही परिस्थितीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वारंवार टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. याबाबत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. माजी नगरसेवक अरूण पवार यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी काही दिवसांतच पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे आश्‍वासन दिले होते.

गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी केला समाधान व्यक्त करत श्री. पवार यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. म्हसरुळ येथील पुष्पकनगर भागात पाण्याच्या तीव्रटंचाईने नागरिक हैराण झाले होते. या भागात नवीन जलकुंभ बांधूनही जलकुंभास पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरात नव्याने वाढणाऱ्या वसाहतींना पाणीपुरवठा होत नव्हता. (latest marathi news)

Sakal Impact
SAKAL Impact : अखेर रावेरच्या ‘नागझिरी’ पुलाच्या कामाला मुहूर्त; अडीच महिन्यात बांधकाम करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान

पाण्यासाठी येथील महिलांनी मनपा विभागीय कार्यालयावर मोर्चा नेला होता.त्यानंतर याठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आली. यानंतर जलकुंभाला पाणीपुरवठा झाल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष किरण कोठुळे, सूर्यभान वांजुळ, किरण भरसट, योगेश आठवणे, निवेदिता कोठूळे, काजल वावरे, वर्षा पवार, राजेंद्र बागुल, यमुना वांजुळ, केतकी आठवणे, सुजाता मुसमाडे, वंदना बागुल,संदीप अहिरे, शोभाबाई पिंपळे आदी उपस्थित होते.

Sakal Impact
SAKAL IMPACT : भडगाव रोड भागातील कचरा डेपो हटवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com