

Nashik MIDC Land Acquisition
eskal
नवीन नाशिक : आडवण व पारदेवी येथील जमीन ‘एमआयडीसी’ने संपादित करू नये, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी (ता. २१) भर पावसात आत्मक्लेष आंदोलन केले. सुपीक शेती, निसर्गसंपदा आणि परिसरातील धरणांमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व असून, ही जमीन आमची मायभूमी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमीन संपादित होऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर व विष्णू कोकणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन प्रस्तावित जमीन संपादनाचा निषेध करण्यात आला. शेती आणि गावाचे अस्तित्व धोक्यात आणणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
एमआयडीसीने जमीन संपादनाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा यापुढे अधिक तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. सुनील कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे, ज्योती कोकणे, विमल कोकणे, सुमन कोकणे, उषा कोकणे, सुनीता कोकणे, सविता शेलार, रंजना शेलार, माधुरी कोकणे, नंदा कोकणे, बीजाबाई कोकणे, लता कोकणे, शीतल कोकणे, संगीता रेरे, अनुसया रेरे, सरू रेरे आदी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.