

Sharad Pawar Enters Tata Sons-Tata Trusts Dispute; Says ‘Protecting Tata Legacy Is Need of the Hour’
eSakal
Sharad Pawar on Tata Group Dispute: टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवरून टाटा ट्रस्ट्स आणि टाटा सन्सच्या संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी टाटा समूहाच्या संस्थात्मक रचनेबाबत भाष्य करत सोशल मीडिया मध्यम X वर एक पोस्ट केली आहे. टाटा समूहाचा वारसा आणि टाटा ट्रस्टची सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे, असे पवार म्हणाले.