Nashik News : पाण्याचा शेतीसाठी अतिरिक्त वापर होऊ देऊ नका : मंत्री छगन भुजबळ

Nashik News : सर्व विभागांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
Minister Chhagan Bhujbal while speaking at the officers' review meeting.
Minister Chhagan Bhujbal while speaking at the officers' review meeting. esakal

येवला‌ : पाणीटंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. उपलब्ध साठ्यातून पाण्याचा अतिरिक्त वापर शेतीसाठी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. टँकर भरण्यासाठी थ्री फज वीजपुरवठा दिवसा सुरळीत ठेवावा. सर्व विभागांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. (Nashik Minister Chhagan Bhujbal use of water for agriculture marathi news)

येथील संपर्क कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, आबा महाजन, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी किरण देशमुख, गटविकासाधिकारी महेश पाटील, मच्छिंद्रनाथ धस, कार्यकारी अभियंता एम. बी. ढोकचोळे, उपविभागीय अभियंता यो. अ. घुगे आदी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, की सद्यस्थितीत ५१ गावे व १५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तेथील साठवण विहिरी अधिग्रहीत करून रोटेशननुसार गावनिहाय पाणीवाटप सुरळीत कसे राहील याबाबत अधिकारी यांनी दक्ष रहावे. अडतीस गावे, राजापूरसह ४१ गावे, धुळगावसह १७ गावे, लासलगावसह १६ गावे पाणीयोजनेची सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करा.

Minister Chhagan Bhujbal while speaking at the officers' review meeting.
Pune University : कुलगुरू डॉ. गोसावींच्‍या दौऱ्याबाबत नाराजी; उद्योजकांसोबत बैठकीला लागला नाही मुहूर्त

शासनाकडून मिळालेली ६३ कोटींची दुष्काळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. पीकविम्यातीचे वाटपही करावे. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम पावसाळ्याच्या आत पूर्ण करावे. शिवसृष्टी प्रकल्पच्या कामाला गती द्यावी. रेशनकार्डची अपडेशनची प्रकरणे मार्गी लावा. लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम पूर्ण करावे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना द्यावा. वंचित घटकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.

महिला बचतगटांना धनादेशवाटप

सूक्ष्म व लघु प्रक्रिया उद्योग योजनेतून येवला शहरातील चार महिला बचतगटांना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने १७ लाखांचे वाटप भुजबळ यांच्या हस्ते झाले.

Minister Chhagan Bhujbal while speaking at the officers' review meeting.
Nashik Grapes Rates Hike: हंगामाच्या मध्यावर द्राक्षाच्या दराला गोडवा! नाशिक जिल्ह्यातून 15 हजार टन द्राक्ष परराज्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com