Pune University : कुलगुरू डॉ. गोसावींच्‍या दौऱ्याबाबत नाराजी; उद्योजकांसोबत बैठकीला लागला नाही मुहूर्त

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी शुक्रवारी (ता.१५) नाशिक दौऱ्यावर आले होते.
Dr. Suresh Gosavi
Dr. Suresh Gosaviesakal

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी शुक्रवारी (ता.१५) नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र या दौऱ्याबाबत शैक्षणिक क्षेत्रातील काही घटकांतून नाराजी व्‍यक्‍त केली. कुलगुरू डॉ. गोसावी यांची उद्योजकांसोबतची बैठक वेळेअभावी होऊ शकली नाही. यापूर्वी गेल्‍या आठवड्यात कुलगुरू डॉ. गोसावी यांनी नाशिकला ‘सरप्राईज व्हिजिट देताना शिवनई येथील पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राला भेट दिली होती. (nashik Vice Chancellor Dr Gosavi meeting with entrepreneurs marathi news )

यावेळीच त्‍यांनी शुक्रवार (ता.१५) च्या दौऱ्याबाबत घोषणा केली होती. त्‍यानुसार त्‍यांनी सकाळी संस्‍थाचालकांसोबत बैठक घेतली. यानंतर व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्‍या सत्‍कार समारंभास उपस्‍थिती नोंदविली. दुपारी ते यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ येथे भेट देण्यासाठी गेले होते. दुपारी शरणपूर रोडवरील उपकेंद्राच्‍या सभागृहात प्राचार्यांची सहविचार सभा घेतली.  (latest marathi news)

Dr. Suresh Gosavi
Pune University : पीएच.डी. प्रवेशात आता मराठा आरक्षण ; विद्यापीठाकडून कार्यवाही

बैठकी‍नंतर कुलगुरू डॉ. गोसावी यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. वेळेअभावी उद्योजकांसोबत बैठक घेता आली नसल्‍याचे सांगताना आगामी दौऱ्यात उद्योजकांसोबत बैठक घेणार असल्‍याचे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी माध्यम प्रतिनिधींच्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना जाहीर केले. मात्र त्‍यांच्‍या या दौऱ्याविषयी शैक्षणिक क्षेत्रातील काही घटकांकडून नाराजी व्‍यक्‍त होत आहे.

''कुलगुरू डॉ. गोसावी यांचा दौरा राजकीय होता. विद्यापीठातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराविरोधात करीत असलेल्या विरोधाची दौऱ्याला पार्श्वभूमी आहे. कुलगुरूंच्या खास माणसांनी माझ्या विरोधात मोट बांधण्यासाठी, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दौरा योजला. हेमंत धात्रक यांच्या कार्यक्रमाला आल्याचा राग नसून, आम्हीच पुरस्‍कारासाठी आग्रह धरला होता.''- सागर वैद्य, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Dr. Suresh Gosavi
Pune University : रोजगारक्षम शिक्षणक्रम सुरु करणार : कुलगुरू डॉ. गोसावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com