मग हनुमान चालिसा काय पाकिस्तानात म्हणायची? साधु-संतांची कारवाईवर आगपाखड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मग हनुमान चालिसा काय पाकिस्तानात म्हणायची? साधु-संतांची कारवाईवर आगपाखड

मग हनुमान चालिसा काय पाकिस्तानात म्हणायची? साधु-संतांची कारवाईवर आगपाखड

नाशिक : राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल त्यांनी केला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. पुढे ते म्हणाले होते की, तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? असा सवाल त्यांनी केला होता. (MNS) मी कोणत्याही प्रार्थनेविरोधात नाही. तुम्ही तुमची प्रार्थना जरूर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको. युरोपात तरी कुठे भोंगे आहेत? असा सवाल त्यांनी केला होता. या साऱ्या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावायला सुरुवात केली आणि पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई सुरु केली. यावर आता विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (Hanuman Chalisa)

हेही वाचा: दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग

नाशिक रोड येथील महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी भोगा प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र शासनाला सर्व संत समाजाच्या वतीने मला प्रश्न करायचा आहे, की हनुमान चालिसा, वेद मंत्रपाठ हे भारतात म्हणायचे नाहीत, तर मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायचे?

हेही वाचा: यशवंत जाधव प्रकरण: कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

पुढे ते म्हणाले की, आज महाराष्ट्र शासन मठमंदिरांवरती जिथे हनुमान चालिसा लावली जात आहे, तिथे कारवाई करत आहे, दंडवसुली करत आहे. तर मग मशिदीवरती भोग्यांवरती कर्णकर्कश्श आवाजामध्ये दररोज सकाळी अजान पठन केलं जातं, त्यांच्याकडून दंडवसुली का केली जात नाही? हा भेदभाव का? यासंदर्भात लवकरच सर्व साधू संत महंत आघाडा परिषद आणि हिंदुत्व मानणारे जाणणारे भक्त हे सर्व याविरुद्ध नाशिक पोलिस आयुक्तांना भेटणार आहेत आणि निवेदन देऊन योग्य ती कारवाी करण्यासाठी विनंती करणार आहेत.

Web Title: Nashik Mns Hanuman Chalisa Masjid Aniket Shastri Deshpande From Nashik Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikBabri Masjid