Nashik PM Narendra Modi : रखरखत्या उन्हात घुमला ‘मोदी, मोदी’चा नारा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर अखंड सुरू झालेला ‘मोदी, मोदी’चा नारा, असे जल्लोषी वातावरण पिंपळगाव बाजार समितीच्या प्रांगणाने बुधवारी (ता. १५) अनुभवले.
Crowd attending Prime Minister Narendra Modi's campaign rally at Bazar Samiti on Wednesday.
Crowd attending Prime Minister Narendra Modi's campaign rally at Bazar Samiti on Wednesday.esakal

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, रखरखत्या उन्हातही त्यांच्यातील सळसळता उत्साह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर अखंड सुरू झालेला ‘मोदी, मोदी’चा नारा, असे जल्लोषी वातावरण पिंपळगाव बाजार समितीच्या प्रांगणाने बुधवारी (ता. १५) अनुभवले. (Modi slogan started after arrival of Prime Minister Narendra Modi)

निमित्त होतं, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार व हेमंत गोडसे यांच्या जाहीर सभेचे... दरम्यान, मोदी यांचे गांधी टोपी, घोंगडी, विविध देवतांच्या मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षांनंतर पिंपळगावला येत असल्याने त्यांच्या दौऱ्याविषयी प्रचंड उत्सुकता होती.

सभेची वेळ दुपारी दोनची असली तरी सकाळपासूनच जिल्ह्यातील नागरिक पिंपळगाव बाजार समितीकडे येत होते. महायुतीच्या मंत्री, आमदारंनी शक्तिप्रदर्शन करत आपापले कार्यकर्ते सभास्थळी आणले. या वेळी उमेदवारांच्या चिन्हाचे गमशा गळ्यात घातले होते. ‘जय श्रीराम’, ‘अबकी बार चारसौ पार’, ‘हमारा परिवार मोदी परिवार’ असे फलक घेऊन कार्यकर्ते सभास्थळी पोचले. (latest marathi news)

Crowd attending Prime Minister Narendra Modi's campaign rally at Bazar Samiti on Wednesday.
Nashik News : तोरंगणला वादळी वाऱ्याने घरांचे नुकसान; घरे, शाळांचे पत्रे उडाले, आंबा पिकालाही फटका

महिलांनीही भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. गळ्यात भगवा गमशा व फेटा बांधला होता. या वातावरणामुळे भगवी लाट दिसून आली. सभास्थळी मोदी यांचे आगमन होताच उपस्थित हजारो लोकांनी उभे राहुन त्यांना अभिवादन केले. यांसह ‘मोदी, मोदी’ नावाची जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामध्ये महिलांही आघाडीवर होत्या.

मोदी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ आदी घोषणा देताच उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सभामंडपाकडे येण्यासाठी पिंपळगाव शहरातून एकच मार्ग असल्याने जोपूळ रस्त्यावर सभा संपल्याने नागरिकांचा जनसागर दिसला. महामार्गावरील जोपूळ व चिंचखेड रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सभास्थळापासून तीन किलोमीटरपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Crowd attending Prime Minister Narendra Modi's campaign rally at Bazar Samiti on Wednesday.
Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com