Collage Admission : ‘डिग्री’च्‍या 75 हजाराहून अधिक जागा; उच्च शिक्षणाचे वेध

Nashik News : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागले आहेत.
Admission
Admission esakal
Updated on

Nashik News : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागले आहेत. विविध पारंपरिक पदवी तसेच व्‍यावसायिक अभ्यासक्रम असे मिळून सुमारे ७५ हजाराहून अधिक जागा उपलब्‍ध राहणार आहेत. विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रिया त्‍यांच्‍या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. (More than 75 thousand seats of Degree)

नाशिक जिल्ह्यात सुमारे ११९ महाविद्यालये असून, त्‍यांच्‍या माध्यमातून सुमारे नव्वद पदवी अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्‍ध आहेत. यंदा बारावीच्‍या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५९ हजार ३५९ हजार असली तरी, उत्तर महाराष्ट्र स्तरावरून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नाशिकला दाखल होत असतात. त्‍यामुळे प्रवेशासाठी चुरस बघायला मिळते.

विशेषतः संगणक शाखेशी निगडित तसेच विज्ञान विद्याशाखेच्‍या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ बघायला मिळते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवी स्‍तरावर प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुमारे ७५ हजार जागा उपलब्‍ध राहणार आहेत.

सद्यःस्‍थितीत पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीची प्रक्रिया संबंधित महाविद्यालयामार्फत त्‍यांच्‍या स्‍तरावर राबविली जाते आहे. तर व्‍यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जाणार असल्‍याने, या परीक्षांच्‍या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी व पालकांना लागून आहे. (latest marathi news)

Admission
Nashik News : पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई! येवल्यात जेसीबी, पोकलेनद्वारे स्वच्छता मोहीम

अभियांत्रिकीच्‍या साडे आठ हजार, फार्मसीच्‍या साडे पाच हजार जागा

पदवी अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक प्रचलित अभ्यासक्रम अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील आहेत. यामध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या नाशिक जिल्‍ह्‍यात सुमारे साडे आठ हजार जागा उपलब्‍ध आहेत. तर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेच्‍या सुमारे साडे पाच हजार जागा उपलब्‍ध आहेत. याशिवाय कला, वाणिज्‍य, विज्ञान विद्याशाखांच्‍या तसेच विधी, शिक्षणशास्‍त्र, व्‍यवस्‍थापनशास्‍त्र, हॉटेल मॅनेजमेंटच्‍या जागांचादेखील समावेश आहे.

वैद्यकीयच्‍या प्रवेशासाठी नीटच्‍या निकालाची प्रतीक्षा

एमबीबीएस, बीडीएस यांसह इतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षेच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. सध्या बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी प्रवेशासाठी उत्‍सुक विद्यार्थी व पालकांकडून नीट परीक्षेच्‍या निकालाची प्रतीक्षा केली जाते आहे.

प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण सर्वाधिक

चार जिल्‍ह्‍यांचा समावेश असलेल्‍या नाशिक विभागातून विशेष श्रेणीसह (७५ टक्‍यांपुढे) २५ हजार १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीसह (६० टक्‍यांपुढे) ६६ हजार ५०० विद्यार्थी, द्वितीय श्रेणीसह (४५ टक्‍यांपुढे) ५० हजार ००४ विद्यार्थी, उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्‍यांपुढे) ७ हजार ३६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Admission
Nashik Lok Sabha Constituency : स्थानिक मुद्यांवर रोष कायम; मताधिक्याबाबत उत्सुकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.