
नाशिक : सीएनजी तुटवड्यामुळे वाहनचालकांबरोबरच पंपचालकही हैराण झाले आहेत. मागणीच्या तुलनेत फक्त २५ टक्के पुरवठा होत असल्यामुळे सर्वच सीएनजी पंपावर लांबच लांब रांगा किंवा सीएनजी बंद असे फलक दिसत आहेत. कमी किंमत व मायलेज अधिक यामुळे ज्यांनी सीएनजी वाहने खरेदी केली, त्यांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. एमएनजीएल कंपनीचे विल्होळी, आडगाव व चेहेडी येथे पंप आहेत. सदर तीन पंप वगळता नाशिकमधील कुठल्याही सीएनजी पंपाला मागणी इतका पुरवठा होत नाही.