नाशिक महापालिका यंदा तरी विकासाची गंगा वाहणार का?

शाळेपासून स्मशानभूमीपर्यंत समस्यांचा महापूर
Nashik Municipal Corporation Election
Nashik Municipal Corporation Election

नाशिक : महापालिकेची स्थापना झाल्यापासूनच अडगळीत असलेला हा भाग अद्यापही सुविधांपासून वंचित राहिला आहे. मेट्रोकडे वाटचाल करण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी, शाळेपासून स्मशानभूमीपर्यंत अनेक समस्यांचा येथे महापूर आहे. पक्षिय राजकारणाबरोबरच गावकीच्या राजकारणाने विकासापासून कोसो दूर असलेल्या या प्रभागात यंदा तरी विकासाची गंगा वाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.(Nashik Municipal Corporation Election)

अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असलेला या प्रभागाकडे आत्तापर्यंत लोकप्रतिनिधींनी जेवढे दुर्लक्ष केले तेवढे दुर्लक्ष महापालिका प्रशासनानेदेखील केले आहे. मोठी नागरी वसाहत असलेल्या या भागात स्मशानभूमी अद्याप नाही. त्यामुळे एकतर सातपूर किंवा सिडकोतील मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेह जाळायला न्यावी लागतात.

दहावीपर्यंतची शाळा नसणे हा येथे मोठा शाप असल्याचे या भागातील लोक मानतात. रस्ते, पाणी, दिवाबत्ती, पाण्याची समस्या पाचवीलाच पुजलेली. या समस्या नवीन नाही, सुरवातीपासूनच या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. अविकसितपणाचा ठपका कोणा एका पक्षावर ठेवता येणार नाही. सर्वच पक्ष कमी- अधिक प्रमाणात जबाबदार आहे. या प्रभागात भंगार बाजार केंद्रबिंदू आहे. औद्योगिक वसाहतीमुळे उत्तर भारतीय मतदान प्रभावी ठरते. छटपूजा येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने उत्तर भारतीय मतदारांची मनधरणी हादेखील महत्त्वाचा विषय ठरतो. भंगार बाजारामुळे मुस्लिम एकगट्टा मतदान महत्त्वाचे ठरते.

हे आहेत इच्छुक

भागवत आरोटे, राकेश दोंदे, योगेश शेवरे, मधुकर जाधव, चंद्रकांत खाडे, सचिन भोर, निवृत्ती इंगोले, रामदास दातीर, भालचंद्र दोंदे, शमीम शेख, तेजस्विनी झोले, ज्योती कवर, डॉ. अमृत सोनवणे, पुष्पावती पवार, यशवंत पवार, स्वप्ना माळी, मच्छिंद्र माळी, स्वप्नील पासले, विनोद दोंदे, सुनीता गुंबाडे, संदीप तांबे, सुभाष गुंबाडे, रामदास मेदगे, अशोक पारखे, अविनाश शिंदे, अरुण दातीर, लखन कुमावत, सुभाष बडे.

प्रभागाची व्याप्ती

चुंचाळे, दत्तनगर, भोर टाऊनशिप, संजयनगर, खालचे वरचे चुंचाळे, मेडगेनगर, दत्तमंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर.

  • उत्तर : नाशिक महापालिका हद्दीवरील नंदिनी नदीपासून पुढे नंदिनी नदीने सातपूर अंबड लिंक रोड अमृत गार्डन मागील रोडवरील पुलापर्यंत.

  • पूर्व : नंदिनी नदीवरील सातपूर अंबड लिंक रोडवरील पुलापासून सातपूर अंबड लिंक रोडने एक्सलो जंक्शनपर्यंत.

  • दक्षिण : सातपूर अंबड लिंक रोडवरील एक्सलो जंक्शनपासून भगवती किराणा, ओमेगा इंजिनिअर्स, मातोश्री आकाश दातीर यांचे घर घेऊन महापालिकेच्या चुंचाळे घरकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याने चुंचाळे घेऊन महापालिका घरकुल सोडून मनपा हद्दीपर्यंत.

  • पश्चिम : महापालिका घरकुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मनपा हद्दीपासून नंदिनी नदीपर्यंत. पुढे नंदिनी नदीने हॉटेल अमृत गार्डनच्या पाठीमागील नंदिनी नदीपर्यंत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com