esakal | नगरसेवकांना हवाय अधिक विकास निधी! रखडलेल्या अंदाजपत्रकासाठी सोमवारी सभा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik municipal corporation

यंदाच्या अर्थसंकल्पात आयुक्त कैलास जाधव यांनी नगरसेवकांना प्रत्येकी ४० लाख रुपये विकासकामांसाठी तरतूद केली आहे.

नगरसेवकांना हवाय अधिक विकास निधी!

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना (Corona) संसर्गाचा सामना करणाऱ्या महापालिकेचे रखडलेले अंदाजपत्रक (Budget) सोमवारी (ता. ३१) महासभेला (General Assembly) सादर केले जाणार आहे. स्थायी समितीने अंदाजपत्रकात ४०० कोटींची तरतूद केली आहे. महासभा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्य विभागासाठी किती प्रमाणात तरतूद करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने (Administration) दोन हजार ३६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ४०० कोटींची वाढ केली. (nashik municipal corporation stagnant budget will be presented to the general body on monday)

हेही वाचा: उन्हाळ कांदा खातोय भाव ! २५ ते ३०० रुपयांनी झाली वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने पंचवटी, सिडको व सातपूर विभागामध्ये तीन विशेष संसर्गजन्य आजारांचे रुग्णालय उभारण्याची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. कोरोनामुळे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी तीन महिने विलंब झाला. आता कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना आता स्थायी समितीने महासभेकडे अंदाजपत्रक सादर केले आहे. स्थायीचे अंदाजपत्रक दोन हजार ६५९ कोटींवर पोचले आहे. आता विशेष अंदाजपत्रकीय सभेत मंजुरी देण्याबरोबरच नवीन योजनांचा समावेश केला जाणार असल्याची शक्यता आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होईल.

हेही वाचा: जातपंचायतीची मनमानी रोखण्यासाठी हेल्पलाईन !

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भरीव तरतूद

यंदाच्या पंचवार्षिकमधील हे शेवटचे वर्ष असून, पुढील आठ महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. पहिली दोन वर्षे नगरसेवकांसाठी विकासकामांच्या दृष्टीने व्यवस्थित गेले. त्यानंतर मात्र तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वाधिकार एकवटून घेत नगरसेवकांच्या विकासकामांवर फुली मारली होती. त्यानंतर रुजू झालेले आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या कार्यकाळामध्ये विकासकामांना चालना मिळाली. मात्र, गेल्या दीड वर्षापासून शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नगरसेवकांच्या विकासकामांना ब्रेक लागला.

यंदाच्या अर्थसंकल्पात आयुक्त कैलास जाधव यांनी नगरसेवकांना प्रत्येकी ४० लाख रुपये विकासकामांसाठी तरतूद केली आहे. त्या निधीतून कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आले. निवडणुकीचे शेवटचे वर्ष असल्याने येत्या सात-आठ महिन्यांत कामांचा बार उडवून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी अधिक आर्थिक तरतुदीची मागणी होण्याची शक्यता आहे. (nashik municipal corporation stagnant budget will be presented to the general body on monday)