नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. २२) रात्री उशिरा महापालिकेतर्फे प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभाग रचना जाहीर करताना २०१७ नुसारच प्रभागांच्या रचना ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्या आहेत. महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये वर्चस्व राखण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेतून २०१७ ची प्रभाग रचना कायम ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.