Nashik Municipal Election
sakal
नाशिक: पालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने महायुतीतच ‘बिघाडी’ होण्यासारखी स्थिती आहे. पक्षाचे प्राबल्य असलेले नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना झुकते माप द्यायला तयार नसल्याने स्वबळावर रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे.