Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी सुरू; ३१ प्रभागांची प्रारूप यादी शासनाला सादर
Finalization of Draft Ward List for Nashik Municipal Elections : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीला गती मिळाली आहे. महापालिकेने ३१ प्रभागांच्या प्रारूप रचनेचा अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला बंद पाकिटात सादर केला आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीचा भाग म्हणून चार सदस्यांचे २९ व तीन सदस्यांचे दोन असे एकूण ३१ प्रारूप प्रभागांची यादी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला महापालिका प्रशासनाकडून बंद पाकिटात मंगळवारी (ता. ५) सादर केली जाणार आहे.