Election
Election
नाशिक: महापालिका निवडणुकीत संपूर्ण पश्चिम विभाग राजकीयदृष्ट्या ‘हॉट’ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपमध्ये दिग्गजांना प्रवेश दिल्यानंतर पक्षातूनच झालेला विरोध, महाविकास आघाडीतून कडवी झुंज देण्यासाठी केलेली व्यूहरचना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने टाकलेले जाळे, भाजपच्या निष्ठावंतांकडून मिळणारी छुपी रसद व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वपक्षीय शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली तयार होणारे विरोधकांचे पॅनल या बाबी प्रभाग तेरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.