नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; इच्छुकांची कार्यालयात झुंबड

Nashik municipal corporation election 2022
Nashik municipal corporation election 2022

Nashik Municipal Election 2022 : महापालिका निवडणुका (Municipal Elections) वेळेत होतील कि नाही यावर गेल्या दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. नाशिक महापालिकेची प्रभाग रचना (Ward Structure) मंगळवारी (दि. 1) दुपारी जाहीर झाली असून, यंदा ४४ प्रभाग राहणार आहेत.

सकाळपासून महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती. महापालिकेची यंदा ७ वी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने प्रारूप प्रभागरचना आज उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे यात प्रभाग क्रमांक ८ मध्ये चार सदस्य अर्थात नगरसेवक निवडले जाणार आहेत. तसेच आजपासूनच हरकती व सूचना मागविल्या जाणार असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील.

मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना

नाशिक महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. कोरोना (Corona), आरक्षणाच्या (Reservation) गोंधळामुळे अद्यापर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. नियमित वेळेत निवडणुक झाल्यास आता पर्यंत आचारसंहिता लागु होणे अपेक्षित होते परंतू तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली. सहा जानेवारीला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) ८ फेब्रुवारीला निर्णय होणार असल्याने प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होईल. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा एक फेब्रुवारीला जाहीर करण्याचे घोषित केले. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द केली जाणार असून याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जातील. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.

Nashik municipal corporation election 2022
नाशिक महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार

१५ मार्चलाचं मुदत संपणार

नाशिक महापालिकेची पंचवार्षिक मुदत पंधरा मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानुसार एक मार्चला महापौर, उपमहापौर कार्यालयाला त्यासंदर्भातील पत्र नगरविकास विभागाकडून प्राप्त होईल. या कालावधीत निवडणुक न झाल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. परंतू त्यापुर्वीचं प्रशासकीय राजवट लागु होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात येत नाही. तोपर्यंत प्रशासकीय राजवट लागू होणार नाही. त्यापुर्वी प्रशासक बसवायचा असल्यास महापालिका बरखास्त करावी लागेल. परंतू बरखास्ती शक्य नसल्याने प्रशासक बसविण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

एप्रिल महिन्यात निवडणुक?

प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केल्यानंतर आजपासून १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सुचना मागविल्यानंतर राज्य निवडणुक आयोगाकडे अहवाल सादर करण्यापर्यंत साधारण फेब्रुवारी अखेर प्रभाग रचना अंतिम केली जाईल. या दरम्यान मतदार याद्यांचे भागनिहाय विभाजन होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यास पुढील ४५ दिवसात एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुक होवू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली.

Nashik municipal corporation election 2022
नाशिक : वर्ष होऊनही मेट्रो निओचा नारळ फुटता फुटेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com