Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना सत्तेत बसल्याने नियमानुसार शिवसेना (उबाठा) पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागली आहे. भाजप-शिवसेना एकत्रित सत्तेचा प्रयोग शिवसेना (उबाठा) पक्षासाठी फायदेशीर ठरला आहे; तर काँग्रेसबरोबर आघाडी म्हणून नोंदणी करण्यात आल्याने गुणांक वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वीकृत सदस्य कमी होऊन शिवसेना (उबाठा) किंवा काँग्रेसचा एक सदस्य स्वीकृत म्हणून बसेल.