Nashik News : Mylan मध्ये मोठी पगारवाढ! 19 हजार 666 रुपयांची घसघशीत वाढ

Nashik : फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या मायलॅन कंपनीत १९ हजार ६६६ रुपयांचा पगारवाढीचा करार करण्यात आला.
Mylan salary Hike
Mylan salary Hikeesakal

Nashik News : फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या मायलॅन कंपनीत १९ हजार ६६६ रुपयांचा पगारवाढीचा करार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या पगारवाढीचा हा करार असल्याचे कामगार वर्गात बोलले जात आहे.

गेल्या काही वर्षांत हॉस्पिटल, मेडिकल म्हणजेच फार्मा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. यात मायलॅन कंपनीनेही आपला विस्तार करत वेगळी उंची गाठली आहे. (Mylan pharma company salary hike marathi news)

नुकताच त्यांचा सहाय्यक कामगार आयुक्त शर्वरी पोटे यांच्या दालनात कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक ओएसडी हेड प्रमोदकुमार सिंग, कॉर्पोरेट हेड (एच. आर.) डॉ. एन. एम. राव, व्हाइस प्रेसिडेंट (एच. आर.) जितेंद्र खैरे, जी. एम. (एच.आर.)

प्रशांत संगमनेरकर, प्लॅन्ट हेड मनोज जैन, उदय कचवेकर, कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष मोरे, उपाध्यक्ष कमानकर, जनरल सेक्रेटरी किरण गोजरे, रवींद्र देशमुख, महेश पवार, राजेंद्र प्रभुणे यांच्यात सकारात्मक वातावरणात हा करार करण्यात आला. (Latest Marathi News)

Mylan salary Hike
Nashik ZP News : जि. प.च्या असमाधानकारक कामावर पालकमंत्र्यांचे ताशेरे; प्रशासनाला आठवड्याचा अल्टिमेटम

या कराराचे वैशिष्ट्ये म्हणजे हा करार १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत राहणार आहे. कंपनी व युनियनचा हा सहावा करार असून, त्यात १९ हजार ६६६ रुपयाची घसघशीत वाढ झाल्याने जुन्या कामगारांना ९० हजार ते नवीन कायम झालेल्या कामगार किमान ५५ हजार रुपये पगार मिळणार आहे. तसेच सेवेला

दहा वर्षे पूर्ण झाले असतील, तर त्या कामगाराला दोन लाखांची, २० वर्षे सेवा पाच लाख, २५ वर्षांपुढील सेवा सहा लाखांचे अधिक अनुदान मिळणार आहे.

Mylan salary Hike
Nashik News : नाशिक उपकेंद्र सहायक कुलसचिवपदाचा श्रीपाद बुरकुले यांनी स्‍वीकारला पदभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com