
नाशिक : श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचव्या दानपेटीच्या चोरीला पाच दिवस उलटूनही चोरटा हाती लागत नसल्याने पाचव्या दानपेटीचे गूढ कायम आहे. ही घटना देवस्थानच्या सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याबाबत पोलिस ठाण्यात रीतसर तक्रारही नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, देवस्थानला चार दानपेट्यांतून तब्बल अकरा लाख रुपये प्राप्त झाले आहे. पैशांबरोबरच भाविकांनी देवाला अर्पण केलेल्या सोन्याचांदीचे मूल्यांकन केले असता पावणेपाच लाख रुपयांचे सोन्याचांदीच्या वस्तू प्राप्त झाल्या.