Namami Goda Project : ‘नमामी गोदा’ प्रकल्पाला सल्लागार संस्थेकडूनच अडसर

Nashik News : शहरातून वाहणारी गोदावरी नदी पुनर्जीवित करण्यासाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविला जाणार आहे.
Namami Goda Project
Namami Goda Projectesakal

Nashik News : शहरातून वाहणारी गोदावरी नदी पुनर्जीवित करण्यासाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविला जाणार आहे. मात्र अद्यापही या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होत नाही. सल्लागार संस्थेकडून महापालिकेने सुचविलेल्या सूचनांचा समावेश आराखड्यात केला जात नसल्याने ताकीद देण्यात आली आहे. नाशिक शहरातून गोदावरी नदीचा प्रवास १९ किलोमीटरचा आहे. (Nashik Namami Goda project)

गोदावरी नदी घाटावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने जगभरात धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी गोदावरीत स्नानासाठी लाखो भाविक येतात. परंतु गेल्या काही वर्षात कंपन्या व घरातून बाहेर पडणारे सांडपाण्याचे नाले नदीत मिसळत असल्याने प्रदूषण वाढले आहे. दरवर्षी गोदावरी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु उपयोग होत नाही.

केंद्र सरकारने बनारसमध्ये गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी नमामि गंगा प्रकल्प राबविला. त्याच धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदी सौंदर्यीकरण व प्रदूषणमुक्त करण्यासाठी नमामि गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे. 2020 मध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.

महापालिकेने सल्लागार संस्थेची नियुक्तीदेखील केली, परंतु अद्यापपर्यंत संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला नाही. वर्षाच्या प्रारंभी यासंदर्भात बैठक झाली. या वेळी महापालिकेच्या विविध विभागाकडून महत्त्वाचे बदल सुचविण्यात आले. जसे की, गोदावरी सौंदर्यीकरण, मलजल व्यवस्था, स्वच्छता या बाबींचा समावेश होता. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना यात सूचनांचा समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले होते. (latest marathi news)

Namami Goda Project
Nashik Crime News : गोमांसासह टेम्पो जप्त! चालकाला अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनची कामगिरी

लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर बुधवारी (ता. ५) महापालिका मुख्यालयात सल्लागार संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली मात्र संस्थेकडून प्रकल्प अहवाल सादर केला गेला नाही. त्यामुळे ताकीद देतानाच पुढील आठवड्यामध्ये पुन्हा कामाचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या, अशी माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

काय आहे प्रकल्पात?

- गोदावरी प्रदूषणमुक्त.

- नदीत मिसळणारे गटारींचे पाणी थांबविणार.

- नव्या गटारी टाकण्याबरोबरचं जुन्या गटारींची दुरुस्ती.

- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमतावाढ.

- कारखान्यांच्या सांडपाण्याचा पुनर्वापर.

- गोदाघाट विकास व सौंदर्यीकरण.

Namami Goda Project
Nashik News : बॉईज टाऊन प्रकरणी समिती गठित; पालकांकडून रोष व्‍यक्‍त, व्‍यवस्‍थापनाने फेटाळले आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com