
नाशिक : कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते. घरकाम करणाऱ्या मोलकरणींना जशी कामाची गरज असते तशीच नोकरदार महिलांना घरकाम करणाऱ्या महिलांची गरज असते. नव्हे तर घरकामांसाठी त्यांच्यावरच अवलंबून असतात. दोन्ही घटक एकमेकांना पूरक असतात पण, वागणुकीबाबत एकीला आदर तर दुसरीच्या वाट्याला बहुधा अनादर येतो. म्हणून ‘या’ महिलांना घरकाम करताना थोडासा आदर मिळावा एवढीच अपेक्षा आहे. (navratri 2024 maids women house workers)
नोकरदार महिलेला समाजात मान, सन्मान मिळतो. त्यांना मॅडम म्हणून हाक मारली जाते. याउलट घरकाम करणाऱ्या मोलकरणींना दोन प्रेमाचे शब्दही वाट्याला येत नाहीत. चहा, पाणी मिळाले तरी ते दुसऱ्या कप, ग्लासातून दिले जाते. या वागणुकीचे अधिक दु:ख होते.
जेमतेम शिक्षण, महिन्याला सहाशे-आठशे रूपयांत घरकाम करणाऱ्या महिलांचे कष्ट कुणाला दिसून येत नाहीत. कामावर दांडी मारली तरी पगारातून पैसे वजा केले जातात. त्यात पतीची साथ असली तर ठीक. पती व्यसनाधीन असेल तर आई, मुलांसह पूर्ण कुटुबांची वाताहत होते. याउलट काही घरांमध्ये घरातील सदस्यांप्रमाणे वागणूक मिळते. घासातला घास दिला जात असल्याचा अनुभव सांगितला जातो. (latest marathi news)
"पतीच्या निधनानंतर १७ वर्षांपूर्वी तिन्ही मुलांना लहानाचे मोठे केले. शिक्षण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. जिल्हा घर कामगार मोलकरीण संघटनेशी जोडली गेल्याने ज्या महिला धुणीभांडी करतात त्यांना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी मार्गदर्शन करते."
- मीना आढाव, अध्यक्ष, जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटना
"पती रिक्षा चालवितो. घरखर्च भागत नसल्याने धुणी, भांडी, झाडू, फरशीचे काम करते. घरातील सर्व काम उरकून सकाळी १० वाजता घराबाहेर पडते. महिनाभर राबून एकही सुट्टी न घेता सहाशे-सातशे रुपये मिळतात. काय भागत एवढ्या पैशात, शिक्षण कमी असल्याने घरकामाशिवाय पर्याय नाही."- चित्रकला मोगल, आदर्शनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.